Thakurdev Yatra Saam tv
महाराष्ट्र

Thakurdev Yatra : आदिवासींच्या संघर्षासाठी ठाकूरदेव यात्रा; छत्तीसगडमधून भाविक दाखल

Gadchiroli News : गडचिरोलीसह महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यातील आदिवासी समाजासाठी सुरजागड टेकड्यांवर असलेल्या ठाकूरदेवाच्या यात्रेचे अनन्य साधारण महत्त्व जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ही यात्रा भरते

Rajesh Sonwane

मंगेश भांडेकर 
गडचिरोली
: गडचिरोली जिल्ह्यात गेली काही वर्षे एटापल्ली तालुक्यातील सुरजागड टेकड्या लोहखनिज उत्खनन व खाणीसाठी चर्चेत आहे. लोह खनिज उत्खननासाठी डोंगर सपाट केले जात असून यामुळे जंगल, आदिवासी त्यांच्या परंपरा व दैवत नष्ट होत असल्याची ओरड केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर सुरजागड येथे वार्षिक ठाकूरदेव यात्रा संपन्न होत आहे. यात्रेत आदिवासी समाज या विषयावर मंथन करणार आहे.

गडचिरोलीसह महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यातील आदिवासी समाजासाठी एटापल्ली तालुक्यातील सुरजागड टेकड्यांवर असलेल्या ठाकूरदेवाच्या यात्रेचे अनन्य साधारण महत्त्व आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ही यात्रा भरते. सुरजागड टेकड्यांवर गेली काही वर्षे लोहखनिज उत्खनन होत आहे. लॉयड मेटल्स कंपनीद्वारे होणारे हे उत्खनन म्हणजे डोंगर सपाट करून जंगल नष्ट करत आदिवासींची संस्कृती, प्रथा, परंपरा, दैवते नष्ट करण्याचा डाव असल्याचा आरोप होत आहे. 

७० गावातील नागरिक करतात संयोजन 

एकीकडे आदिवासींना विकासाच्या नावावर विस्थापित करायचे आणि दुसरीकडे भांडवलदारांना मोकळीक द्यायची; असा हा डाव असल्याची ओरड सातत्याने होत आहे. या संघर्षातला संवेदनशील मुद्दा म्हणजे सुरजागड परिसरातील ठाकूरदेव यात्रा. हजारो आदिवासी या यात्रेसाठी एकत्र जमतात. कार्यकर्ते विस्थापनाविरोधात भूमिका घेत आहेत. ही आदिवासी समाजाच्या पिढीसाठीची शेवटची हाक असल्याचेही बोलले जात आहे. तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेत ठाकूरदेवाला नवसाचे बळी दिले जातात. ७० गावांच्या आदिवासी इलाख्यातील नागरिक यात्रेचे संयोजन करतात. 

त्या कंपनीकडूनच यात्रेसाठी सोयीसुविधा 

नक्षली संवेदनशील भाग असल्याने पोलिस बंदोबस्त तगडा असतो. या यात्रेत विस्थापन व दैवते नष्ट करण्याच्या मुद्द्यावर मंथन- मार्गदर्शन होणार आहे. हे थांबले पाहिजे अशीच आदिवासी कार्यकर्त्यांची भावना आहे. महत्त्वाचे म्हणजे ज्या लॉयड मेटल या लोहखनिज उत्खनन कंपनीवर आदिवासी समाजाचा रोष आहे. त्याच कंपनीने या परिसरात यात्रेसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यात्रेतील सुसूत्रता कंपनी व्यवस्थापनामुळे असल्याचे स्पष्टपणे दिसते. आता ज्या कंपनीच्या विरोधात आदिवासी एकवटले आहेत, तीच या भागात सोयीसुविधा पुरवत असल्याचे आढळून आल्यानंतर नक्की संघर्ष कोण आणि कुणासाठी करतोय याबाबत गोंधळाची स्थिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT