GADCHIROLI ACCIDENT: 6 YOUTHS HIT DURING MORNING WALK, 4 DEAD AI Photo
महाराष्ट्र

Gadchiroli accident: मार्निंग वॉकसाठी गेले अन् काळाने गाठलं! ६ मित्रांना भरधाव वाहनाने चिरडले, भयंकर अपघात

Gadchiroli accident: गडचिरोलीमध्ये मर्निंग वॉकसाठी गेलेल्या सहा तरुणांना भरधाव वाहनाची धडक; चौघांचा मृत्यू, परिसरात तणाव निर्माण झाले आहे. मृत्यू झालेले सर्व मित्र हे विद्यार्थी होते, नागरिक संतप्त झाले आहेत.

Namdeo Kumbhar

  • गडचिरोलीतील काटली गावाजवळ सकाळी ५ वाजता भीषण अपघात

  • मर्निंग वॉकला गेलेल्या सहा तरुणांना भरधाव गाडीने उडवलं

  • पिंकू भोयर (14), तन्मय मानकर (16) यांचा जागीच मृत्यू

  • दिशांत मेश्राम आणि तुषार मारबते यांचाही रुग्णालयात मृत्यू

6 youths hit by vehicle in Katli village : गडचिरोलीमध्ये पहाटे पाच वाजता एका अज्ञात वाहनाने सहा जणांना चिरडलेय. या भयंकर अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारावेळी मृत पावले. इतर दोन जणांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजतेय. आज पहाटे पाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान काटली गावाजवळ हा भीषण अपघात झाला. अपघातानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले असून रस्ता आडवला आहे. त्यामुळे आरमोरी गडचिरोली महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. (Gadchiroli road accident latest news)

गडचिरोली आरमोरी मुख्य मार्गावरील काटली येथील नाल्याजवळ मार्निंग वॉकसाठी गेलेले सहा तरूणांना भरधाव वाहनांने उडवले. दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जणांनी रूग्णालयात उपचारावेळी प्राण सोडले. दोन तरूणाची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे. त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हेलिकॉप्टरने रवाना करण्यात आलेले आहे. भीषण अपघातानंतर संतप्त जमावाने रस्त्यावर आंदोलन केले, त्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक झाले होते. काटली - साखरा, पोर्लाच्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली. गडचिरोली पोलीसांना माहीती मिळताच गडचिरोली पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले ठाणेदार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मदत कार्य व अधिक तपास सुरू आहे.

आज सकाळी 5.30 च्या दरम्यान काटलीचे सहाजण मित्र नित्याप्रमाणे नाल्याजवळ व्यायाम करण्यासाी गेले होते. आरमोरी वरून गडचिरोलीकडे जाणाऱ्या गाडीने सर्वांना उडवले. पिंकू नामदेव भोयर वय 14 वर्ष काटली, तन्मय बालाजी मानकर वय 16 वर्ष काटली यांचा जागीच मृत्यू झाला. दिशांत दुर्याधन मेश्राम, तुषार राजेंद्र मारबते यांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले आहे. दोन जणांना गडचिरोली वरून नागपूरकडे हेलिकॉप्टरने रवाना करण्यात आलेले आहे. तर क्षितिज तुळनिदास मेश्राम, आदित्य धनजंय कोहपते, हे दोन जण गंभीर जखमी आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: 'मराठी माणसासाठी BMC निवडणूक शेवटची; राज ठाकरेंनी कोणत्या धोक्याचा इशारा दिला?

Rahul Gandhi: राहुल गांधी अ‍ॅक्शन मोडवर, बिहारमधील पराभवानंतर काँग्रेसच्या ७ बड्या नेत्यांची हकालपट्टी

अयोध्यानगरीत PM मोदींचं भव्य स्वागत होणार, 5000 महिला आरती करणार, कसं आहे ध्वजारोहण कार्यक्रमाचं वेळापत्रक?

Gauri Palve : पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेला अटक; डॉ गौरी पालवेची आत्महत्या की हत्या?

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह १८ जणांना बेड्या, राज्यभरात रॅकेट?

SCROLL FOR NEXT