Gadchiroli Naxal News Saam Tv
महाराष्ट्र

Gadchiroli Latest News : गडचिरोली पोलिसांनी नक्षलवाद्यांचा कट उधळला; दोन स्फोटके आणि 12 बोर रायफल जप्त

Gadchiroli Naxal News : गडचिरोली पोलिसांनी नक्षलवाद्यांचा कट उधळला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

>> मंगेश बांदेकर

Gadchiroli Naxal News : नक्षलवाद्यांनी पोलीस जवानांना लक्ष ठरवून पेरून ठेवलेले भूसुरुंग स्फोट निकामी करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई धानोरा तालुक्यातील पोलीस मदत केंद्र ग्यारापती हद्दीतील टिप्पागड जंगल परिसरात शुक्रवारी केली.

ग्यारापत्ती पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत ग्यारापत्ती मदत केंद्राची पोलीस पार्टी आणि सीआरपीएफचे जवान गोपनीय माहितीवरून अभियान राबवत असताना त्यांना लक्ष करून नक्षलवाद्यांनी जमिनीत स्फोटक पेरून ठेवले होते. (Latest Marathi News)

यामध्ये एका डम्पमध्ये 12 बोर रायफल, देशी बनावटीचे दोन स्फोटक, नक्षली लिखाण साहित्य, बॅनर, शूज आणि इतर दैनंदिन वापराचे साहित्य जवानांनी जप्त केले आहे. नक्षलवाद्यांनी पेरलेले स्फोटक वेळीच निदर्शनास आल्याने मोठा अनर्थ टळला.

झारखंडमध्ये पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 5 नक्षलवाद्यांचा खात्मा

दरम्यान, झारखंडमध्ये सीमा सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये पुन्हा एकदा चकमक (Jharkhand Encounter) झाली होती. या चकमकीमध्ये पाच नक्षलवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना (Jharkhand Police) यश आलं होतं.

झारखंडच्या सीमा सुरक्षा दलाने पलामू-चतरा सीमेवर नक्षलविरोधी अभियान सुरु केले आहे. या अभियानामध्ये सीआरपीएफ कोब्रा बटालियन, जेएपी, आयआरबी यांच्यासह पलामू आणि चत्राच्या जिल्हा सुरक्षा दलाचा समावेश आहे.

या अभियानादरम्यान 3 एप्रिल रोजी सकाळी नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. या चकमकीमध्ये पाच नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT