CM Eknath Shinde Ayodhya Tour: CM शिंदेंनंतर देवेंद्र फडणवीसही अयोध्येला रवाना! शिंदे- फडणवीस सरकारसाठी का महत्वपूर्ण ठरणार अयोध्या दौरा?

CM Eknath Shinde And Devendra Fadanvis Visit Ayodhya: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुमारे 9 तास प्रभू रामाच्या नगरी अयोधयेमध्ये घालवतील. या दौऱ्यासाठी भाजपने संपूर्ण ताकद लावली आहे.
Eknath Shinde Ayodhya Tour
Eknath Shinde Ayodhya TourSaamtv
Published On

Cm Eknath Shinde Ayodhya Tour: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) काल रात्रीच अयोध्या (Ayodhya) नगरीत दाखल झाले आहेत. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे भाजपच्या मंत्र्यांसोबत अयोध्येला जात आहेत. दोन्ही नेते अयोध्येत प्रभू श्रीरामाची महाआरती करणार आहेत. त्यानंतर राम मंदिर बांधकामांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधतील. संध्याकाळी दोन्ही नेते शरयू नदीवर महाआरती करतील. रात्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांची भेट घेणार आहेत. (Latest Marathi News)

Eknath Shinde Ayodhya Tour
Ashadhi Wari 2023: आषाढी वारी सोहळा! संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याची घोषणा; 'या' दिवशी होईल पंढरपूरकडे प्रस्थान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुमारे 9 तास प्रभू रामाच्या नगरी अयोधयेमध्ये घालवतील. प्रभू रामासाठी उभारण्यात येत असलेल्या भव्य मंदिराचा आढावा ते घेणार आहेत. शिंदे मंदिराचं बांधकाम पाहतील. शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार यांच्या मुक्कामासाठी मंदिर नगरातील जवळपास सर्व हॉटेल, गेस्ट हाऊस आणि धर्मशाळा बुक करण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजपची ताकद...

शनिवारी सायंकाळपासून सुरू होणारा मुख्यमंत्री शिंदे यांचा दोन दिवसीय अयोध्या दौरा आहे. महत्त्वाचं म्हणजे हा अयोध्या दौरा भव्यदिव्य करण्यासाठी भाजप महत्त्वाची भूमिका बजावत आहे. 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी ठाकरे सेनेला राज्यभरातील तळागाळात नेस्तनाबूत करण्यासाठी महाराष्ट्रात हिंदुत्वाचा प्रचार करणं ही सध्याची राजकीय खेळी दिसून येत आहे.

Eknath Shinde Ayodhya Tour
Dhule News : शेतात गहू काढताना अंगावर वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू, धुळ्यातील मन सुन्न करणारी घटना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दौऱ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात मोठा संदेश देण्याची तयारी सुरु आहे. शिवसेनेचा शिंदे गट हिंदुत्वाच्या अजेंड्यावर स्वत:ला प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा दौरा प्रभावी भूमिका बजावण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह भाजपने अयोध्या दौऱ्यासाठी संपूर्ण ताकद लावली आहे. (Maharashtra Politics)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com