Ashadhi Wari 2023: आषाढी वारी सोहळा! संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याची घोषणा; 'या' दिवशी होईल पंढरपूरकडे प्रस्थान

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आषाढीवारी सोहळा 11 जुनला आळंदीतुन पालखी प्रस्थान ठेवणार असुन 29 जुनला पंढरीत दाखल होणार आहे.
Ashadhi Wari 2023
Ashadhi Wari 2023Saamtv
Published On

Ashadhi Wari News: आषाढी पालखी म्हटलं की पंढरपूरनगरीमधील (Pandharpur) विलोभनिय दृष्य डोळ्यासमोर उभं राहातं. लाखो वारकरी, राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेली भक्तमंडळी, अन् एकच विठ्ठल नामाचा गजर. महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते, त्या आषाढी पालखी प्रस्थानाची घोषणा झाली आहे. जगतगुरू तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याची तारीख समोर आली होेती. त्यानंतर आता ज्ञानेश्वर माऊलींच्याही पालखी सोहळ्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. (Ashadhi Wari)

Ashadhi Wari 2023
Dhule News : शेतात गहू काढताना अंगावर वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू, धुळ्यातील मन सुन्न करणारी घटना

याबाबत अधिक माहिती अशी की, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली (Dnyaneshwar Mauli) आषाढीवारी सोहळा 11 जुनला आळंदीतुन (Alandi) पालखी प्रस्थान ठेवणार असुन 29 जुनला पंढरीत दाखल होणार आहे. मात्र यंदाच्या आषाढीवारी सोहळा उत्साहात साजरा होत असताना कोरोनाचे सावटही उभे राहिले आहे. देशभरातुन वारकरी मजल दर मजल करत माऊलींच्या या पायी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी येत असतात.

शेतीच्या मशागतीची कामे अटपुन कष्टकरी बळीराजा माऊलींच्या सोबतीने पंढरीकडे प्रस्थान ठेवणा-या सोहळ्यात सहभागी होत असतो. हा वारकरी लाखोंच्या जनसमुदायाच्या उपस्थित माऊलींचा पालखी सोहळा आळंदीत रंगणार आहे. यासाठी आळंदी देवस्थान आणि पालखी प्रमुखांच्या उपस्थित पहिली बैठक पार पडली. यावेळी पालखी प्रस्थान ते पंढरीपर्यतच्या मुक्कामाचे नियोजन आणि अडचणी यावेळी मांडण्यात आल्या.

Ashadhi Wari 2023
Priya Berde On Gautami Patil: 'तमाशा चवीने बघणारे लोक आहेत, तोपर्यंत...' गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांवर प्रिया बेर्डेंनी साधला निशाणा

तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा...

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची (Sant Tukaram Maharaj) पालखी देहूतून 10 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. 28 जून रोजी संत तुकारामांची पालखी पंढरीत दाखल होणार आहे. पालखी सोहळा प्रमुख भानुदास महाराज मोरे, देहू देवस्थानाचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी आज पालखी सोहळ्याबाबतची माहिती दिली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com