Maharashtra Election 2024 Voting update  saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Voting Update : गडचिरोलीकर आघाडीवर, मुंबईत फक्त १५ टक्के मतदान, राज्यात ११ वाजेपर्यंत कोणत्या जिल्ह्यात किती मतदान?

Maharashtra Election 2024 Voting update : राज्यात मतदानाला आताप्रर्यंत अल्प प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे. दुपारनंतर मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता.

Namdeo Kumbhar

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Voting Live : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानालाला राज्यात अल्प प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे. राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत फक्त १८ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. गडचिरोलीमध्ये सर्वाधिक ३० टक्के मतदान झालेय. मुंबईमध्ये फक्त १५ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. राज्यात सर्वात कमी मतदान नांदेडमध्ये झालेय. नांदेडमध्ये फक्त १३ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मतदानाचा हक्क बजावलाय.

राज्यात काही ठिकाणी सुरळीत मतदान पार पडले, तर काही ठिकाणी गोंधळाची परिस्थिती राहिली. सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचं चित्र दिसले. लातूर आणि औरंगाबादमधील काही गावात मतदानावर बहिष्कार टाकण्यात आल्याचेही चित्र आहे. आयोगाने लोकांना मतदानासाठी बाहेर पडण्याचे आवाहन केलेय. राज्यात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान चालणार आहे. २८८ जागांसाठी मतदान होत आहे, मविआ आणि महायुती आमनेसामने आहेत.

राज्यात कोणत्या जिल्ह्यात किती मतदान झालं ?

अहमदनगर - १८.२४ टक्के,अकोला - १६.३५ टक्के,अमरावती - १७.४५ टक्के, औरंगाबाद- १८.९८ टक्के, बीड - १७.४१ टक्के, भंडारा- १९.४४ टक्के, बुलढाणा- १९.२३ टक्के, चंद्रपूर- २१.५० टक्के,धुळे - २०.११ टक्के, गडचिरोली-३० टक्के, गोंदिया - २३.३२ टक्के, हिंगोली -१९.२० टक्के, जळगाव - १५.६२ टक्के, जालना- २१.२९ टक्के, कोल्हापूर- २०.५९ टक्के,लातूर १८.५५ टक्के, मुंबई शहर- १५.७८ टक्के, मुंबई उपनगर- १७.९९ टक्के,नागपूर - १८.९० टक्के,नांदेड - १३.६७ टक्के, नंदुरबार- २१.६० टक्के,नाशिक - १८.७१ टक्के, उस्मानाबाद- १७.०७ टक्के, पालघर-१९ .४० टक्के, परभणी-१८.४९ टक्के,पुणे - १५.६४ टक्के,रायगड - २०.४० टक्के, रत्नागिरी-२२.९३ टक्के,सांगली - १८.५५ टक्के,सातारा -१८.७२ टक्के, सिंधुदुर्ग - २०.९१ टक्के,सोलापूर - १५.६४,ठाणे१६.६३ टक्के,वर्धा - १८.८६ टक्के,वाशिम - १६.२२ टक्के,यवतमाळ -१६.३८ टक्के मतदान झाले आहे.

मुंबईमध्ये फक्त १५ टक्के मतदान-

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाला मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात आज दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ०७.०० वाजेपासून सुरुवात झाली. मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात सकाळी ११.०० वाजेपर्यंत अंदाजे १५.७८ टक्के मतदान झाले आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील सकाळी ११.०० वाजेपर्यंतची विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी (अंदाजे) खालीलप्रमाणे :-

विधानसभा मतदारसंघ मतदानाची टक्केवारी (अंदाजे)

१७८-धारावी - १३.२८ टक्के

१७९-सायन-कोळीवाडा - १२.८२ टक्के

१८०- वडाळा – १७.३३ टक्के

१८१- माहिम – १९.६६ टक्के

१८२-वरळी – १४.५९ टक्के

१८३-शिवडी – १६.४९ टक्के

१८४-भायखळा – १६ .९८ टक्के

१८५- मलबार हिल – १९.७७ टक्के

१८६- मुंबादेवी - १४.९५ टक्के

१८७- कुलाबा - १३.०३ टक्के

पुण्यात कोणत्या मतदारसंघात किती मतदान

Pune Voting

सिंधुदुर्गमध्ये 23.2 टक्के मतदान -

विधानसभा निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळी ७ ते ११ या वेळेत एकूण 23.2 टक्के मतदान झालेय. यामध्ये कणकवली मतदारसंघ २१.३५ टक्के, कुडाळ १५.२ टक्के आणि सावंतवाडी १८.५ टक्के असे मतदान झालेय. सिंधुदुर्गात सकाळी ७ पासून किरकोळ रांगा मतदानासाठी दिसून आल्या. मात्र, सकाळी ९ ते ११ दरम्यान मतदान केंद्रांवर गर्दी होती. यामध्ये प्रामुख्याने जेष्ठ नागरिक, नोकरदार वर्ग यांचा अधिक समावेश होता. सकाळी ९ ते ११ या कालावधीत अधिक मतदान झाले. तर दुपारच्या सत्रात मतदान टक्केवारी कमी होण्याची शक्यता असून दुपारी ३ ते संध्याकाळी ६ पर्यंत मतदान टक्केवारी वाढण्याची शक्यता जास्त आहे.

माढा आणि माण तालुक्यात बुथ ताब्यात घेण्याचा प्रयत्न,खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा गंभीर आरोप

माढा आणि माण तालुक्यामध्ये विरोधकांकडून बूथ ताब्यत करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा गंभीर आरोप माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला आहे. माढा तालुक्यातील वखाव येथे आमदार बबन शिंदे यांच्या समर्थकांकडून बूथ कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आहे. तर माण तालुक्यातील महायुतीचे उमेदवार जयकुमार गोरे यांच्या गावांसह अनेक गावांमध्ये मतदारांच्या बोटाला शाही लावून मतदान न करताच बाहेर काढले जात आहे या सगळ्या प्रकाराची निवडणूक आयोगाने चौकशी करावी व तेथील सीसीटीव्ही फुटेज समोर आणावे अशी मागणी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केली आहे.

Beed Voting : हृदयद्रावक! मतदान केंद्रावरच उमेदवारचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: पुणे जिल्ह्यात दुपारी ३ वाजेपर्यंत ४१.७० टक्के मतदान

Beed Politics: EVM फोडल्याप्रकरणी धनंजय मुंडे आक्रमक, निवडणूक आयोगाकडे तक्रार

Beed Parali Vidhan Sabha: परळीत चार ठिकाणी ईव्हीएमची तोडफोड, केंद्राध्यक्षाला मारहाण

Street Style Sandwich: साधं सँडविच सोडा, हे ब्रेड बटाटा सॅंडविच एकदा खाऊन तर बघा, पाहा रेसिपी

SCROLL FOR NEXT