Gadchiroli Crime News Saam Digital
महाराष्ट्र

Gadchiroli Crime News: बैलाची शिकार केल्यानंतर वाघ झाला होता गायब....वाघाच्या कातडीची तस्करी करताना दोघांना अटक

Gadchiroli Crime News: वाघाच्या कातडीची तस्करी करताना गडचिरोलीच्या एटापल्ली येथे दोघांना वन विभागाने अटक केली आहे. बुधवारी पहाटे ३ वाजता एटापल्ली-जीवनगट्टा मार्गावर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

Sandeep Gawade

Gadchiroli Crime News

वाघाच्या कातडीची तस्करी करताना गडचिरोलीच्या एटापल्ली येथे दोघांना वन विभागाने अटक केली आहे. बुधवारी पहाटे ३ वाजता एटापल्ली-जीवनगट्टा मार्गावर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. शामराव रेमश नरोटे (रा. वासामुंडी) आणि अमजद खान पठाण (रा. एटापल्ली) अशी आरोपींची नावे असून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून वाघाची कातडी जप्त करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र-छत्तीसगड वनविभागाला एटापल्ली तालुक्यात वाघाच्या कातडीची तस्करी संदर्भात माहिती मिळाली होती. खात्रीलायक माहिती असल्यामुळे वनविभागाचे कर्मचारी कामाला लागेल होते. माहितीची खात्री केल्यानंतर 29 नोव्हेंबर रोजी पहाटे 3 वाजता दोन्ही राज्याच्या वनविभागाने एटापल्ली-जीवनगाट्टा मार्गावर सापळा रचला होता. या दरम्यान, एका दुचाकीवरून दोन व्यक्ती संशयास्पद फिरत असल्याचे दिसून आले. त्यांची कसून तपासणी केली असता प्लास्टिक पिशवीत वाघाचे कातडे आढळले. त्यामुळे वन कर्मचाऱ्यांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले व वनकायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महिनाभरापूर्वी एटापल्ली तालुक्यातील मवेली परिसरात वाघाने बैलाची शिकार केली होती. त्यामुळे खळबळ माजली होती. मात्र, त्यांनतर त्याभागात वाघाची कुठलीही हालचाल दिसून आलेली नाही. त्यामुळे या वाघाची शिकार झाल्याचा संशय वन अधिकाऱ्यांना होता. त्यामुळे वन विभागाने त्या दृष्टीने तपास सुरू केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Firing : राज्यात चाललंय काय? गाणी लावण्याच्या वादातून राडा; थेट कला केंद्रात गोळीबार

Beed Accident : बीडमध्ये भीषण अपघात, माजी सरपंच आणि नातीचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

PM Kisan Yojana: 'त्या' शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेचा हप्ता, कारण काय? वाचा

Vice President Election: उपराष्ट्रपती पदाच्या मतदानावेळी India आघाडीची नाही, तर BJPची मतं फुटली; राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा

Nepal News : महाराष्ट्रातील १०० पर्यटक नेपाळमध्ये अडकले, सर्वाधिक पर्यटक 'या' जिल्ह्यातील | VIDEO

SCROLL FOR NEXT