Tadoba Tiger Reserve Project: 'चला माझ्या ताडोबाला'...पाच हजार विद्यार्थ्यांना घडवणार सहल, वन्य प्राण्यांच्या हजाराे प्रजाती पाहण्याची संधी

Tadoba Tiger Reserve Project: वन आणि वन्यजीव याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात आपुलकी निर्माण करण्यासाठी चला माझ्या ताडोबाला हा उपक्रम सुरू आहे. या अंतर्गत यंदा पाच हजार विद्यार्थ्यांना ताडोबाची सहल घडवली जाणार आहे.
Tadoba Tiger Reserve Project
Tadoba Tiger Reserve ProjectSaam Digital
Published On

Tadoba Tiger Reserve Project

वन आणि वन्यजीव याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात आपुलकी निर्माण करण्यासाठी चला माझ्या ताडोबाला हा उपक्रम सुरू आहे. या अंतर्गत यंदा पाच हजार विद्यार्थ्यांना ताडोबाची सहल घडवली जाणार आहे. याची पहिली तुकडी रवाना झाली. चंद्रपूरचा ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प भारतातील एक महत्वाचा व्याघ्र प्रकल्प आहे. या व्याघ्र प्रकल्पाची जैवविविधता संपन्न व समृद्ध आहे. दरम्यान या उपक्रमांतर्गत वन्य प्राणी आणि दुर्मीळ वनस्पतींच्या हजारो प्रजाती पाहण्याची संधी मिळणार आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात ८० प्रजातीचे सस्तन प्राणी, २८० पेक्षा पक्ष्यांच्या प्रजाती, ५४ प्रजातीचे संरपटणारे प्राणी, १२५ प्रजातीचे फुलपाखरे, ६७० पेक्षा अधिक वनस्पती प्रजातींनी या वनाची समृद्धता वाढवली आहे. तर ७९ टक्के वन हे बांबू वनाचे असून वाघाकरिता हा उत्तम असा अधिवास आहे. सन २०२१-२२ मध्ये झालेल्या व्याघ्र गणनेनुसार या व्याघ्र प्रकल्पामध्ये ८७ वाघाची नोंद झाली आहे. स्थानिकांना या वनाचे महत्व कळावे आणि विद्यार्थ्यांनी पुढील आयुष्यात एक जबाबदार नागरिक म्हणून वन संवर्धन व संरक्षणासाठी योगदान द्यावे, या हेतूने निसर्ग संवर्धनातून वन संवर्धन उपक्रम नियमितपणे राबविण्यात येत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Tadoba Tiger Reserve Project
Free Food Grains: गरिबांसाठी सरकारचा मोठा निर्णय; पुढील ५ वर्षे मिळणार मोफत अन्नधान्य

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामार्फत बफर क्षेत्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी "चला माझ्या ताडोबाला" या उपक्रमाअंतर्गत यंदाच्या सहल व शैक्षणिक जागरूकता अभियानाचा प्रारंभ करण्यात आला आहे. या उपक्रमाचा उद्देश शालेय विद्यार्थ्यांच्या मनात निसर्गाविषयी आवड निर्माण करणे आणि वने व वन्यजीव संवर्धनात त्यांचा सहभाग वाढविणे आहे. आजपर्यंत ४० हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या ताडोबा वनभ्रमंतीमध्ये सहभाग घेतला आहे. यंदा लगतच्या गावातील एकूण १२१ शाळेतील ५००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना ताडोबा वनभमंतीसोबतच निसर्ग शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात येईल आणि वने व व्याघ्र संवर्धनाची चळवळ या माध्यमातून अधिक प्रबळ होईल, असा विश्वास ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी व्यक्त केला आहे.

Tadoba Tiger Reserve Project
Nagpur News : पीक विमा तक्रारीसाठीचे ऍप्लिकेशन ठप्प, तक्रारी नोंदविता येत नसल्याने ठाकरे गट आक्रमक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com