Gadchiroli News Saam tv
महाराष्ट्र

Gadchiroli : स्मशानभूमीच्या जागेवरून वाद; दोन गटांत तुंबळ हाणामारी, गावात तणावाचे वातावरण

Gadchiroli News : स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले असून अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या नागरिकांना रोखत त्यांच्याशी वाद घातला. यातून वाद वाढून दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली,

Rajesh Sonwane

गणेश शिंगाडे 

गडचिरोली : गावातील स्मशानभूमीच्या जागेवरून वाद असताना अंत्यसंस्कारासाठी गेले असताना निर्माण झालेल्या वादातून दोन गट आमनेसामने आले होते. यामुळे तुंबळ हाणामारी झाल्याची घटना अहेरी तालुक्यातील नागेपल्ली या गावात घडली आहे. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून गावात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. 

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी शहराला लागून असलेल्या नागेपल्ली या गावात सदरची धक्कादायक घटना घडली आहे. गावातील स्मशानभूमीच्या जागेवर काही वराह पालकांनी अतिक्रमण करत वराह पालन सुरु केले आहे. यामुळे गावात हा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान गावातील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने त्याच्या अंत्यसंस्कारासाठी गेले असताना वाद उद्भवून गावकऱ्यांना मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

अंत्यसंस्कारासाठी अडविल्याने वाद 
गावातील काही लोक एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत गेले असता अतिक्रमण करणाऱ्या अतिक्रमण धारकांनी त्यांना अडवले. यामुळे दोन्ही गटांत जोरदार बाचाबाची झाली. यानंतर पाहता पाहता त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत काही गावकरी जखमी झाले आहे. काही वेळाने हा वाद विकोपाला गेला. दोन्ही गटांनी एकमेकांवर जोरदार हल्ला केला. हातात लाठ्या-काठ्या घेऊन त्यांनी एकमेकांना मारहाण केली. यात अनेक जण जखमी झाले आहेत.

पोलिसांच्या मध्यस्थीने परिस्थिती नियंत्रणात 

दरम्यान गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार अतिक्रमण करण्यात आलेली हि जागा अनेक वर्षांपासून स्मशानभूमी म्हणून वापरली जाते. गेल्या दोन वेळा येथील झालेले अतिक्रमण हटविण्यात आले. मात्र, काही लोकांनी प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फायदा घेत या जागेवर पुन्हा अतिक्रमण केले. मात्र घटनेची माहिती मिळताच अहेरी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही गटांना शांत करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Politics: मोठी बातमी! नाशिकमध्ये भाजपला मोठं खिंडार, एकनाथ शिंदेंनी ३ बडे नेते फोडले

Government Job: सरकारी कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार लाखो रुपये पगार; पात्रता काय? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: आज पुण्यात अजित पवारांचा रोड शो

Gold Rate Today: सोन्याची किंमतीत वाढ की घसरण? वाचा २२ आणि २४ कॅरेटचा आजचा दर

Crime News : धक्कादायक! पत्नी सोडून माहेरी गेली, पतीने दोन वर्षाच्या मुलासह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली

SCROLL FOR NEXT