Gadchiroli Chandrapur Truck Accident Saam TV
महाराष्ट्र

Truck Accident: दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रकच्या भीषण अपघात, २ ठार एक गंभीर

दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रकच्या भीषण अपघात, २ ठार एक गंभीर

Satish Kengar

>> मंगेश भांडेकर

Gadchiroli Chandrapur Truck Accident : गडचिरोली-चंद्रपूर मार्गावरील मुरखळा ग्रामपंचायत जवळ एका भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. येथे अचानक समोर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात असलेल्या ट्रकचा भीषण अपघात झाला आहे.

ट्रकच्या या भीषण अपघातात पादचाऱ्यासह २ जण ठार, तर चालक गंभीर जखमी झाला. मुकरू गोमसकार (५५ रा.मुरखळा) असे मृत पादचाऱ्याचे नाव असून एकाची ओळख पटलेली नाही. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, सूरजागड येथे लोह खनिजाची वाहतूक करणारा ट्रकचालक पिंटू मजोके किसाननगर येथे घरी जाण्यासाठी निघाला होता. वाटेत व्याहाड येथे जाण्यासाठी उभ्या असलेल्या एका प्रवाशाला गाडीत बसवले. दरम्यान सकाळी ११ वाजताच्या सुमारास गडचिरोली- चंद्रपूर मार्गावरील मुरखळा ग्रामपंचायत जवळ ट्रकसमोर दुचाकीस्वार आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात भीषण अपघात झाला.

यावेळी ट्रकने ग्रामपंचायत समोरील स्मारकाला धडक दिली. यात मुरखळा येथील रहिवासी मुकरू गोमसकार यांचा व ट्रकमध्ये बसलेल्या अनोळखी प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. ट्रकचालक पिंटू मजोके हा गंभीर जखमी झाला आहे. अनोळखी प्रवाशाचा मृतदेह गाडीत अडकला होता. (TRUCK ACCIDENT)

मुंबई-गोवा महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात

दरम्यान, आज भरधाव वेगात असलेल्या खासगी बसचं टायर फुटून मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. टायर फुटल्याने चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि प्रवाशांनी भरलेली बस पलटी झाली. या भीषण अपघातात बसमधील ७ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) चांडवे गावाच्या हद्दीत हा खासगी लक्झरी बसला अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या बसचा टायर फुटल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस पलटी झाली. हा अपघात मध्यरात्री पावणे ३ वाजण्याच्या सुमारास झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महायुती कोल्हापूर महापालिका निवडणूक एकत्रच लढणार

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

Couples Tips: सुखी संसाराचं सिक्रेट समजलं, नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

SCROLL FOR NEXT