Wreckage of the Scorpio vehicle after a fatal collision with a travel bus on the Gadchiroli-Chamorshi road. Saam Tv
महाराष्ट्र

गडचिरोलीत थरारक अपघात! लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला; प्रवासी बस आणि कार एकमेकांवर आदळले, 5 जणांचा जागीच मृत्यू

Gadchiroli Chamorshi Road Accident Latest News: गडचिरोली-चामोर्शी मार्गावर स्कॉर्पिओ आणि ट्रॅव्हल्सची भीषण धडक होऊन 5 जणांचा मृत्यू, तर 6 जण गंभीर जखमी झाले आहे.

Omkar Sonawane

गणेश शिंगोडे, साम टीव्ही

गडचिरोली-चामोर्शी मार्गावर स्कॉर्पिओ वाहनाचा ट्रॅव्हल्सशी धडक होऊन पाच जणांचा मृत्यू झाला अनेक जण गंभीर जखमी आहेत.गडचिरोली लग्नाची वरात घेऊन जाणाऱ्या स्कॉर्पिओ वाहनाचा भीषण अपघात होऊन पाच जणांचा मृत्यू तर सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना सायंकाळी 6.45 वाजता घडली.गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील कुरुड-कढोली गावादरम्यान असलेल्या नाल्याजवळील वळणावर हा भीषण अपघात झाला. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, MH 46 P 5392 क्रमांकाची स्कॉर्पिओ वाहनात एकूण 16 प्रवासी प्रवास करत होते. ही गाडी रामपूर येथून दुपारी 3 वाजताच्या दरम्यान लग्न सोहळा आटोपून भाडभीडी मोकासा येथे जात होती. दरम्यान, गडचिरोलीहून चामोर्शीकडे जाणाऱ्या MH 15 CK 5005 या प्रवासी ट्रॅव्हल्सशी स्कॉर्पिओची टार्निंगवर जोरदार धडक झाली. धडकेत स्कॉर्पिओ वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

अपघातानंतर जखमींना तातडीने गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारासाठी नेत असताना वाटेतच दोघांचा मृत्यू झाला. सध्या उर्वरित जखमींवर उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून पोलीस प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT