Gadchiroli News x
महाराष्ट्र

बैलपोळ्याच्या आनंदावर विरजण! शाळेला सुट्टी असल्याने गावी आला, नाल्यात बुडून ६ वर्षीय मुलाचा मृत्यू

Shocking : बैलपोळा सणाच्या दिवशी गडचिरोली जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली. गावालगतच्या नाल्यात पाण्यात बुडून ६ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Yash Shirke

  • बैलपोळ्याच्या दिवशी गडचिरोली जिल्ह्यात ६ वर्षीय मुलगा नाल्यात बुडून मृत्यूमुखी पडला.

  • मृत मुलाचे नाव रिशान पुंगाटी असून तो लाहेरी शासकीय आश्रम शाळेत पहिली इयत्तेत शिकत होता.

  • या घटनेमुळे कोयार गाव व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Gadchiroli News : राज्यभरात बैलपोळा हा सण मोठा उत्साहात साजरा होत असताना गडचिरोली जिल्ह्यातून एक वाईट बातमी समोर आली आहे. बैलपोळ्याच्या निमित्ताने शाळेला सुट्टी असल्याने घरी आलेल्या एका सहा वर्षीय मुलाचा नाल्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील कोयार या ठिकाणी घडली आहे.

गावाजवळच्या नाल्याच्या पाण्यात बुडालेल्या सहा वर्षाच्या मुलाचे नाव रिशान पुंगाटी असे आहे. लाहेरी शासकीय आश्रम शाळेमध्ये रिशान पहिली इयत्तेत होता. बैळपाळा सणाच्या निमित्ताने सुट्टी असल्याने तो कोयार या त्याच्या गावी आला होता. गावी खेळताना नाल्याच्या पाण्यात बुडून लहानग्या रिशानचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (२२ ऑगस्ट) सकाळी रिशान गावालगत असलेल्या नाल्याजवळ खेळायला गेला होता. बराच वेळ झाला, तरीही तो घरी परतला नाही. तेव्हा कुटुंबीयांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा नाल्याजवळ रिशान त्याच्या कुटुंबीयांना आढळला. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले.

परिसरात व्यवस्थित रस्ता नसल्याने तेथे रुग्णवाहिका पोहोचू शकत नव्हती. रुग्णालयात पोहोचवण्यासाठी नारगुंडा येथे खाटेची कावड करुन नेण्यात आले. त्यामुळे कोयार येथून नारगुंडा येथे रिशानला नेण्यात आले. नारगुंडा येथे भामरागड ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका आली. रुग्णालयात नेल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिहारमध्ये मोठी दुर्घटना! गंगा नदीत २० जणांना घेऊन जाणारी बोट उलटली; ११ जणांचा मृत्यू

महायुतीत समन्वयाचा 'दुष्काळ', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा नाराज?

Fact Check: ऑनलाईन शॉपिंग महागणार? ऑनलाईन शॉपिंगवर 5% GST?

नवी मुंबई महापालिकेत मतदार राहतात, वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर 27 मतदारांची नोंद

IMD Alert: महाराष्ट्रासह 17 राज्यात धो-धो बरसणार वरूणराजा; 60 ताशी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

SCROLL FOR NEXT