Gadchiroli Ashram School  saamtv
महाराष्ट्र

1500 लोकांचा मृत्यू, 5 मिनिटांत बॉडी गायब; गडचिरोलीतील मृत्यूंबाबत राऊतांचा मोठा आरोप

Gadchiroli Ashram School : गडचिरोलीत आश्रमशाळेतील संपर्दशांच्या दुर्घटनेने राज्य हादरलंय. यावरुन संजय राऊतांनी गडचिरोलीतील कायदा व सुव्यवस्थेवरुन धक्कादायक दावा केलाय. तर तीन विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर जाग आलेल्या सरकारने आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नवीन एसओपी निश्चित केलीये. पाहूया एक खास रिपोर्ट.

Girish Nikam

जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशीच रात्री गडचिरोलीतील आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय. धानोरा तालुक्यातल्या जपतलई येथील घटनेमुळे मोठू खळबळ उडालीय़. यात तीन मुलींची प्रकृती अजूनही चिंताजनक असून १४ विद्यार्थिनी डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत. या गंभीर घटनेवरुन ठाकरे सेनेने गडचिरोलीतल्या कारभारावरुन सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. गेल्या वर्षभरात तब्बल १५०० आदिवासींचा मृत्यू झाला असून त्यांच्या पाच मिनिटांत बॉड्या गायब करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी केलाय.

विद्यार्थिनींचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्यामुळे राऊतांनी मरण इतकं स्वस्त झालंय? असा सवाल करत वर्षा बंगल्यावर साप सोडा, असा टोला राऊतांनी लगावलाय. तर संस्था कोणाची आहे हे पाहा असं म्हणत विरोधकांच्या टीकेला भाजपने प्रत्युत्तर दिलंय.

विरोधकांच्या चौफेर टीकेनंतर प्रशासनाला जाग आली आहे. आता आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नवीन एसओपी निश्चित करण्यात येणार आहे. सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी आश्रमशाळेला भेट देत मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. पीडित कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची शासकीय मदत जाहीर केली आहे.

काँग्रेसचे माजी आमदार मारोतराव कोवासे यांची ही आश्रमशाळा आहे. या घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निलंबीत तर आश्रमशाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करा, अशी सूचना केली आहे. दरम्यान सर्पदंशाने गंभीर असलेल्या एका मुलीच्या पालकांनी साम टीव्हीशी संवाद साधला. आपल्या मुलीचं पोलिस बनण्याचं स्वप्न आहे. मात्र तीची सध्या मृत्युशी झुंज सुरु असल्याचं सांगितलं.

राज्यातील अनेक आश्रमशाळांमधील भोंगळ कारभार यापूर्वीही समोर आलाय. विद्यार्थ्यांना सुविधा न देता शासकीय अनुदान लाटण्यात मग्न असलेले संस्थाचालक आणि बेजबाबदार अधिकाऱ्यांना चाप कधी बसणार? यंत्रणा आणखी किती निष्पाप मुलींचा बळी घेणार ? हाच खरा सवाल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या सोनम मस्करचा लक्षवेध, १० मीटर एअर रायफल प्रकारात रौप्य पदक

Ganesh Visarjan: गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जन करताना इंजिनिअरिंगच्या २ विद्यार्थ्यांचा मृत्यू

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत

Hill Station: मडगावपासून फक्त 2 किमी अंतरावर आहे हे हिल स्टेशन; मुंबईकरांचं फेव्हरेट डेस्टिनेशन

konkan Beach : महाराष्ट्रातील मिनी मालदीव! कोकणातील समुद्राच्या सौंदर्याला तोड नाही, एकदा फेरफटका माराच

SCROLL FOR NEXT