Gadchiroli Accident Saam Tv
महाराष्ट्र

Gadchiroli Accident: २ दुचाकीची समोरासमोर धडक, दोघांचा जागीच मृत्यू; मुलाच्या डोळ्यासमोर वडिलांनी सोडले प्राण

Maharashtra Accident: गडचिरोलीत दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला. भरधाव दुचाकींनी समोरासमोर धडक दिली. या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला.

Priya More

गणेश शिंगाडे, गडचिरोली

गडचिरोलीमध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये २ जणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. आष्टी येथील चामोर्शी रोडवरील एचपी पेट्रोल पंपासमोर हा अपघात झाला. दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीवरून प्रवासी दूरवर फेकले गेले. या अपघातात दोघे जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. जखमी व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर चामोर्शी रोडवर वाहतूक कोंडी झाली होती.

अपघाताची माहिती मिळताच आष्टी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेंद्र वाघ आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघाताची माहिती कळताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली. अपघातातील जखमीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर दोन्ही मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.

दरम्यान, हा अपघात नेमका कसा झाला यामागचे कारण समजू शकले नाही. या अपघातामध्ये राजू येलमुले आणि श्याम विश्वास या दोघांचा मृत्यू झाला. तर संदीप राजू येलमुले याची प्रकृती गंभीर असून त्याला उपचारासाठी चंद्रपूर येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे अपघाताच्या घटनेमुळे अनकोडा या गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. राजू येलमुले आणि संदीप येलमुले हे बापलेक अनकोडावरून आष्टीकडे येत होते. तर श्याम विश्वास हे आष्टीवरून आपल्या गावी जात होते.

दरम्यान, अमरावतीमध्ये एसटी बसचा अपघात झाला. धोत्रा ते सालोरा मार्गावर एसटी बस उलटली. खराब रस्त्यामुळे एसटी बसचे ब्रेक फेल झाले त्यामुळे बस अनियंत्रित होऊन उलटली. शिरसगाव मोझरीवरून अमरावती शहराच्या दिशेने ही एसटी बस येत होती. एसटी बसमध्ये २० ते २५ प्रवासी होते. या अपघातामध्ये १० प्रवासांना किरकोळ दुखापत झाली. जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बुलढाणा जिल्ह्यातील भोसा घाटात भीषण अपघात

Accident: ६ जिवलग मित्रांचा एकाच दिवशी करुण अंत, देवदर्शनाला जाताना काळाचा घाला

Alkaline Water Benefits: अल्कलाईन वॉटर म्हणजे काय? कोणी प्यावे आणि कोणी पिणे टाळावे? जाणून घ्या फायदे

NCP Merger : पुन्हा भूकंप होणार? अजित पवार गटाच्या आमदारांनी मागितली शरद पवारांची वेळ, काहीतरी मोठं घडणार?

Onion For High Cholesterol: रोज कांदा खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होतं? डॉक्टरांनी सांगितलं कोणी खाल्ला पाहिजे

SCROLL FOR NEXT