नक्षल कमांडर मिलिंद तेलतुंबडेवर लालगुडा येथे अंत्यसंस्कार (पहा Video) संजय राठोड
महाराष्ट्र

नक्षल कमांडर मिलिंद तेलतुंबडेवर लालगुडा येथे अंत्यसंस्कार (पहा Video)

26 नक्षलवाद्यांचा खात्मा झाला यामध्ये नक्षल चळवळीचे कमांडर मिलिंद तेलतुंबडे (Commander Milind Teltumbde) याचा देखील समावेश होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय राठोड -

यवतमाळ : गडचिरोली आणि छत्तीसगड (Gadchiroli and Chhattisgarh) सीमेवर गस्त घालत असताना काही नक्षलवादी (Naxalites) त्या भागात असल्याचे माहिती मिळाली होती. पोलीस आणि नक्षलवाद्यांच्यात चकमक झाली, यामध्ये 26 नक्षलवाद्यांचा खात्मा झाला यामध्ये नक्षल चळवळीचा कमांडर मिलिंद तेलतुंबडे (Commander Milind Teltumbde) याचा देखील समावेश होता.

तेलतुंबडे वरती वणी लगत असलेल्या लालगुडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. माओवादी छत्तीसगडमधून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावेळी माओवादी विरोधी पथकाने या परिसरात कोम्बिंग ऑपरेशन (Combing operation) हाती घेतले. यावेळी जवान आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली.

शनिवारी सकाळी ग्यारापतीच्या जंगलात पोलीस आणि माओवादी यांचे मधील चकमक सुरू झाली होती. यावेळी तब्बल 26 नक्षलवाद्यांचा खातमा करण्यात पोलिसांना यश मिळाले होते. त्यात चार जवान देखील जखमी झाले आहेत. दरम्यान; शौर्य गाजविणाऱ्या जवानांना सरकारी नियमानुसार बक्षिसे देण्यात येईल, अधिक बक्षीस देण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip WalsePatil) म्हणाले आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

Maharashtra Live News Update: सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या खांबटकी घाटात ट्रकला मोठी आग

Maharashtra Politics : ‘म’ म्हणजे मराठी नव्हे, तर ‘म’ म्हणजे महापालिका! चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर घणाघात

SCROLL FOR NEXT