नागपूर : गडचिरोली आणि छत्तीसगड (Gadchiroli and Chhattisgarh) सीमेवर गस्त घालत असताना काही नक्षलवादी त्या भागात असल्याचा सुगावा लागला. पोलीस आणि नक्षलवादी (Police and Naxalites) यांच्यात चकमक झाली, यामध्ये 26 नक्षलवाद्यांचा खात्मा झाला तर चार जवान जखमी झाले, आज मी गडचिरोली ला भेट दिली, जवानांचं अभिनंदन केलं, आज जखमी जवानांची मी घेत घेतली, त्यांची प्रकृती उत्तम आहे, लवकरच ते रुजू होतील अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये दिली.
हे देखील पहा -
तसेच गृहमंत्री म्हणाले 'राज्यात दोन तीन घटना झाल्या त्यामध्ये पोलिस दलातील सर्व वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी गेले आहेत, त्या ठिकाणची स्थिती नियंत्रणात आणत आहेत. शौर्य गाजविणाऱ्या जवानांना सरकारी नियमानुसार बक्षिसे देण्यात येईल, अधिक बक्षीस देण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असही ते म्हणाले. ते आज गडचिरोली मध्ये जखमी झालेल्या जवानांची चौकशी करण्यासाठी नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात (Orange City Hospital) आले असताना माध्यमांशी बोलले.
दरम्यान नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केलेले आरोप याबाबत डिटेल्स मला माहित नाही. मात्र, हिंसाचाराच्या घटनांची चौकशी करण्याचे आदेश दिले असून. चौकशीचा रिपोर्ट आल्यानंतर कोण सहभागी आहे हे कळेल जमावबंदी असताना तुम्ही जर मोर्चे काढत असाल तर संबंधित अधिकाऱ्यांमार्फत कारवाई केली जाईल असा इशारा देखील त्यांनी यावेळी विरोधी पक्षाला दिला.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.