Taliye Landslide राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

रायगडमधील दरडग्रस्त गावांच्या कायम स्वरूपी पुनर्वसनासाठी निधी मंजूर- विजय वडेट्टीवार

दरडग्रस्त गावांचे (Taliye Landslide) कायम स्वरूपी पुनर्वसन व्हावे याकरीता शासनाने १३ कोटी २५ लाखाचा निधी मंजूर केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड: जिल्ह्यात २२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टी मध्ये महाड मधील तलीये, पोलादपूर मधील केवनाळे आणि सुतारवाडी येथे दरड (Landslide) कोसळून ९० जणांचा मृत्यू झाला. अनेकांचे संसार उध्वस्त झाले. दरडग्रस्त गावांचे (Taliye Landslide) कायम स्वरूपी पुनर्वसन व्हावे याकरीता शासनाने १३ कोटी २५ लाखाचा निधी मंजूर केला आहे. रायगड (Raigad) जिल्ह्यातील दरड कोसळलेल्या गावांच्या तात्पुरत्या पुनर्वसनाकरिता २५ लाख ७९ हजार १९२ रूपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettivar) यांनी दिली. त्यामुळे दरड ग्रस्तगावांचे पुनर्वसन लवकरात लवकर होण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) महत्वाचा निर्णय घेतला आहे.

२२ व २३ जुलै, २०२१ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील मौजे तळीये, कोंडाळकरवाडी व बौध्दवाडी, मौजे केवनाळे व पोलादपूर तालुक्यातील मौजे साखर (सुतारवाडी)  ही गावे बाधीत झाली होती तसेच मनुष्यहानी देखील झाली होती. दरड कोसळून बाधित झालेल्या नागरीकांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याच अनुषंगाने या गावांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनाकरीता भुसंपादन, नागरी व सार्वजनिक सोयी सुविधा, विद्युत पुरवठा, जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा करणे या कामांकरीता १३ कोटी २५ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. (Fund Sanctioned For Taliye Landslide)

महाड तालुक्यातील मौजे तळीये, कोंडाळकरवाडी व बौध्दवाडी मध्ये भुसंपादन करण्यासाठी २ कोटी ९२ लाख १७ हजार ७६१ रूपये, मौजे केवनाळे मध्ये भुसंपादन करण्यासाठी ६४ लाख २६ हजार १४८ रूपये, पोलादपूर तालुक्यातील मौजे साखर (सुतारवाडी) साठी ३८ लाख ४१ हजार ७८६ रूपये असे एकूण भुसंपादनासाठी ३ कोटी ९४ लाख ८५ हजार ६९५ रूपये तर महाड तालुक्यातील मौजे तळीये तर कोंडाळकरवाडी व बौध्दवाडी मध्ये नागरी व सार्वजनिक सोयी सुविधा, विद्युत पुरवठा तसेच जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा करणे या कामांकरीता ९ कोटी ३० लाख १६ हजार ५५२ रूपये निधीची तरतूद करण्यात आली आहे असे एकूण १३ कोटी २५ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णयही ८ फेब्रुवारी २०२२ रोजी पारित करण्यात आला आहे.

हे देखील पहा-

रायगड जिल्ह्यातील दरड कोसळलेल्या गावांच्या तात्पुरत्या पुनर्वसनाकरिता २५ लाख ७९ हजार १९२ रूपये निधीची तरतूद

२२ व २३ जुलै, २०२१ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील मौजे तळीये, कोंडाळकरवाडी व बौध्दवाडी,मौजे केवनाळे व पोलादपूर तालुक्यातील मौजे साखर (सुतारवाडी) या गावांच्या तात्पुरत्या पुनर्वसनाच्या प्रस्तावासही शासनाने मान्यता दिली असल्याने जिल्हाधिकारी, रायगड यांनी प्रस्तावित केल्यानुसार कंटेनर चौथरा तयार करणे, नळ पाणी पुरवठा योजना करणे तसेच रस्ते व ड्रेनेज लाईन तयार करणे इत्यादी कामांसाठी आवश्यक एकूण रु. ५५ लाख ५८ हजार ३८४ रूपये इतक्या निधीपैकी ५०% म्हणजे एकूण रु. २५ लाख ७९ हजार १९२/- इतका निधी या शासन निर्णयाद्वारे मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचाही दिनांक ८ फेब्रुवारी २०२२ रोजी दुसरा शासननिर्णय मदत व पुनर्वसन विभागाने निर्गमीत केलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: दुष्काळात तेरावा महिना...सराव सामन्यात संघातील प्रमुख फलंदाज दुखापतग्रस्त

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर, तीन सभा घेणार

Maharashtra Election : नाकाबंदी सुरू होती, कारमध्ये सापडलं घबाड, जळगावात २० लाख कॅश पकडली, आतापर्यंत ४ कोटी जप्त

Bigg Boss 18: सलमानच्या बिग बॉसमध्ये लागणार तडका; किम कार्दशियन घेणार वाइल्डकार्ड एन्ट्री?

VIDEO : आमदार शहाजी बापू पटलांचं मतदारांना भावनिक आवाहन; म्हणाले... | Marathi News

SCROLL FOR NEXT