एकीकडे पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने जनता त्रस्त असतानात आता इंधनाचा तुटवडाही निर्माण झालाय. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात काही पेट्रोल पंपावर नो स्टॉकचे बोर्ड झळकतायेत. तर काही ठिकाणी वाहनधारकांच्या लांब रांगा लागतायेत. मात्र त्यातून वाद निर्माण होऊन हाणामारीचे प्रसंग घडतायेत.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथे डिझेल भरण्यावरून तुंबळ हाणामारी झाली. डिझेलच्या तुटवड्यामुळे पंपावर मोठी गर्दी झाली होती. त्यातच 'नंबर' लावण्यावरून वाद उफाळला. या वादातून १० ते १२ जणांनी संजय जायभाये या युवकाला मारहाण केली.
वाशिममध्येही आकोला नाका परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल घेण्याच्या वादातून तुफान हाणामारी झालीय. डिझेलचे टँकर दाखल होताच वाहनचालकांनी रांगा लावल्या. मात्र यावेळी किरकोळ वादाचं रुपांतर हाणामारीत झालंय... नागरिकांनी चक्क डिझेलच्या कॅननं एकमेकांना मारहाण केलीय. हिंगोली जिल्ह्यातही इंधन टंचाईचे संकट गडद झालंय... संतप्त शेतकऱ्यांनी पेट्रोल पंपावरच ठिय्या मांडलाय... जिल्ह्यातील 35 पैकी 20 पेट्रोल पंपांवरील डिझेल साठा संपल्यानं शेतीची कामं ठप्प झालीत.... डिझेलचे कॅन डोक्यावर घेऊन शेतकऱ्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणा दिल्या.
जालन्यातही भीषण इंधन टंचाई निर्माण झालीय...अनेक पेट्रोल पंपांवर 'नो स्टॉक'चे फलक लागलेत. याचा मोठा फटका शेती कामांना बसलाय. सध्या मशागतीचे दिवस असूनही ट्रॅक्टरला डिझेल मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल झालाय..
परभणी जिल्ह्यातही इंधन टंचाई निर्माण झालीये. शहरातील तसेच ग्रामीण भागातील अनेक पेट्रोल पंपांवर नो स्टॉकचे फलक लागलेय. तर काही ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्याय.
दुसरीकडे नंदुरबारच्या धडगावमध्ये इंधन संपणार अशा अफवेने मोठा गोंधळ निर्माण झालाय. भर उन्हात पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या एक-दीड किलोमीटर लांब रांगा लागल्यात. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, लोक हातात प्लास्टिकचे ड्रम आणि पाण्याच्या बाटल्या घेऊन इंधन भरण्यासाठी गर्दी करतायंत. एकीकडे महागाईच्या वणव्यात सामान्य जनता होरपळतेय. तर दुसरीकडे इंधन तुटवड्याच्या कचाट्यात नागरिक भरडले जात असल्याने आता जगायचं कसं ? अशा प्रश्न उपस्थित होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.