Mahua heritage liquor global market Saam TV
महाराष्ट्र

Mahua Liquor : आदिवासींची दारू 1 लाख रुपये लिटर, मोहाच्या दारूला पब-मॉलमध्ये मागणी

Mahua heritage liquor global market : आदिवासींच्या पारंपरिक मोहाच्या दारूला आता जागतिक स्तरावर प्रीमियम स्पिरिट म्हणून ओळख मिळत आहे. आदिवासी महिलांना रोजगार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळत आहे.

Namdeo Kumbhar

सुप्रीम मस्कर, साम टीव्ही प्रतिनिधी

आता बातमी आहे मद्य शौकीनांसाठी. मोहाची फुलं हा निसर्गाने भरभरून दिलेला रानमेवा आहे. मात्र, मोहफूल नावाचा हा रानमेवा त्यापासून तयार होणाऱ्या दारूमुळे मोठा बदनाम ठरत आलाय. मात्र आता मोहाच्या दारूचा स्वदेशी ब्रँड देशात चर्चेत आलाय. नेमकं प्रकरण काय? पाहूयात या रिपोर्टमधून.

दीर्घकाळ बेकायदा, निकृष्ट आणि 'गावठी दारू' म्हणून हिणवल्या गेलेल्या मोहाच्या दारूची प्रतिमा आता पूर्णपणे बदलणार आहे...जंगलातल्या आदिवासींच्या झोपडीतून थेट लंडन, ऑस्ट्रेलियातल्या मोठ्या मॉल्स आणि चकचकीत पबपर्यंत या मोहाच्या दारूनं मोठी मजल मारलीय. ज्या दारूला कधीकाळी लोक नाकं मुरडायची, तिच्या एका प्रीमियम बाटलीची किंमत आता चक्क 1 लाख रुपयांवर गेलीय. त्यामुळे या स्वदेशी पेयानं जागतिक बाजारात धुमाकूळ घातलाय. स्वदेशी मोहाची दारू ब्रँड कशी झाली..पाहूयात...

आदिवासींची दारू 1 लाख रुपये लिटर

- ब्रिटिशांनी धोकादायक घोषित केलेली स्वदेशी मोहाची दारू आता आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रीमियम ब्रँड ठरलीय

- साऊथ सीज डिस्टलरीजनं लाँच केलेल्या मोहाच्या स्पिरिटच्या एका प्रीमियम बाटलीची किंमत 1 लाख 20 हजार रू

मोहाच्या दारूला आता जागतिक स्तरावर व्हाइट स्पिरिट म्हणून ओळख

- मध्य प्रदेश आणि छत्तीसगड सरकारनं मोहाला ऐतिहासिक वारसा पेय म्हणून घोषित करत कायदेशीर उद्योगाचा दर्जा दिलाय

- कमर्शियल उत्पादनामुळे जंगलात फुलं गोळा करणाऱ्या आदिवासी महिलांना आणि स्थानिक रोजगाराला फायदा

म्हणूनच मध्य प्रदेश आणि छत्तीसगड सरकारनं मोहाच्या दारूला चक्क 'हेरिटेज लिकर' म्हणजेच ऐतिहासिक वारसा पेयाचा दर्जा दिलाय. या कमर्शियल उत्पादनामुळे जंगलात फुले गोळा करणाऱ्या आदिवासी महिलांना आणि स्थानिक रोजगाराला मोठा आर्थिक हातभार लागत असून आदिवासींची अर्थव्यवस्था सुधारतेय. त्यामुळे ज्या मोहाला ब्रिटिशांनी बंदीच्या बेडीत अडकवले होते, तेच पेय आज भारताची नवी आंतरराष्ट्रीय ओळख बनत आहे. जंगलातील आदिवासींच्या हाताला काम आणि जागतिक बाजारात 1 लाखाचा दाम मिळवून देणारी ही मोहाची दारू खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय ब्रँड' ठरतेय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बळीराजाच्या सुख-समृद्धीसाठी डोंबिवलीत पार पडला नवकुंडात्मक सहस्रचंडी महायाग

Rajma vs Chole: राजमा की छोले, सर्वाधिक प्रोटिन कशात? उत्तर वाचून आश्चर्यचकित व्हाल

शेतजमीन खरेदीचा प्लॅन आहे का? ५ महत्त्वाचे डॉक्युमेंट्सच तपासाच; अन्यथा आयुष्यभराची कमाई बुडणार

high fiber superfoods : पोट निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर आहेत हे 7 फायबरयुक्त सुपरफूड्स

Upvasachi Batata Bhaji Recipe : नवरात्रीच्या उपवासाला बनवा दाण्याच्या कुटाची बटाट्याची भाजी, चव इतकी भन्नाट की पुन्हा पुन्हा खाल

SCROLL FOR NEXT