Ajit Pawar Passed Away saam tv
महाराष्ट्र

Ajit Pawar Passed Away: खासदार ते सहा वेळा उपमुख्यमंत्री; अशी राहिली अजित पवारांची राजकीय कारकिर्द!

Ajit Pawar political career: महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी विमान अपघातात निधन झाले.

Surabhi Jayashree Jagdish

आज सकाळी अजित पवार यांच्या विमान अपघाताची बातमी समोर आली. या बातमीनंतर काही वेळानेच अपघातात अजित पवार यांचं निधन झाल्याची माहिती आहे. दादा गेले हे कळताच बारामतीकर हळहळले. आपल्या महाराष्ट्राला एक आदर्श घालून देणारे महाराष्ट्राचे दादा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज बारामतीमध्ये विमान अपघातात निधन झालंय.

राज्याच्या राजकारणामध्ये गेल्या साडेचार दशकांपासून अजित पवार हे नाव सातत्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चेत होतं. राज्याच्या राजकारणामध्ये त्यांचं काम, धडाडी, एकहाती नेतृत्व आणि शरद पवारांचे वारसदार म्हणून अजित पवार यांच्याकडे नेहमीचं पाहिलं जात होतं. मात्र अजित पवार यांच्या अकाली एक्झिटने पवार कुटुंबियांसह संपूर्ण राज्याला मोठा हादरा बसला आहे.

अजित पवारांची कारकिर्द कशी होती?

अजित पवार यांनी १९९१ साली प्रथमच लोकसभेची निवडणूक लढवली होती. यावेळी ते बारामतीचे खासदार झाले. त्याच वर्षी राजीव गांधी यांच्या हत्येनंतर केंद्रात बदल करण्यात आले. त्यावेळी राष्ट्र शरद पवार संरक्षण मंत्री झाले. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. तेव्हापासून ते सातत्याने बारामतीतून विजयी होत आहेत.

मंत्रीपदाचा दीर्घ अनुभव

अजित पवार १९९१ साली पहिल्यांदा मंत्री झाले. १९९५ ते १९९९, २०१४ ते २०१९ आणि २०२२ ते २०२३ हा कालावधी सोडला तर बाकीच्या काळात त्यांच्याकडे मंत्रीपद होतं. गेल्या तीन दशकांत इतका मोठा काळ मंत्रिपद भूषवणारे ते राज्यातील एकमेव नेते मानले जातात.

त्यांनी अर्थमंत्री, जलसंपदामंत्री, ग्रामविकास मंत्री अशा महत्त्वाच्या खात्यांचा कारभार पाहिला आहे. पुण्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर ते एक वर्ष विरोधी पक्षनेते होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Death News LIVE Updates : पुणे जिल्ह्यात दुखावटा जाहीर

Famous Actress : सिनेसृष्टी हादरली! घरगुती वाद टोकाला गेला; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या नवऱ्यावर नातवाईकांनीच केला चाकू हल्ला, नेमकं घडलं काय?

Skin Care : चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी तांदळाचा 'हा' १ उपाय ठरेल सगळ्यात बेस्ट

Maharashtra Live News Update: मावळ तालुक्याच्या माजी आमदार रूपरेखा ढोरे यांचं निधन

Ajit Pawar Plane Accident Place: अजित पवारांचा अपघात झाला ते ठिकाण कुठं आहे?

SCROLL FOR NEXT