अहमदनगर ते आष्टी धावली रेल्वे.. नागरिकांच्या आशा पल्लवित ! विनोद जिरे
महाराष्ट्र

अहमदनगर ते आष्टी धावली रेल्वे.. नागरिकांच्या आशा पल्लवित !

बीड जिल्ह्यातील नागरिकांचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न असलेल्या नगर- बीड- परळी या 261 किलोमीटर अंतराच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे (project) काम सध्या वेगात सुरु

विनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यातील नागरिकांचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न असलेल्या नगर- बीड- परळी या 261 किलोमीटर अंतराच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे (project) काम सध्या वेगात सुरु आहे. या मार्गावरील सर्वात मोठा आणि लांब असलेल्या मेहेकरी नदीवरील (Mehekari River) पुलाचे काम नुकतेच पूर्ण आहे. त्यानंतर काल अहमदनगर (Ahmednagar) ते कडा या स्थानकांदरम्यान एक रेल्वे धावली आहे.

हे देखील पहा-

नगर- बीड- परळी हा रेल्वेमार्ग (Railroad) बीड (Beed) जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. 261 किमी रेल्वे मार्गाला 1995 मध्ये मंजुरी मिळाली होती. त्यावेळी 353 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. मात्र, निधीच्या अभावी प्रकल्प कित्येक वर्षे रखडला होता. आता 27 वर्षानंतर या प्रकल्पाच्या कामाला वेग आला आहे. (From Ahmednagar to Ashti run train)

मागील दोन वर्षात नगर ते नारायण डोह आणि नागायण डोह ते सोलापूरवाडी (Solapurwadi) अशा दोन टप्प्यांची चाचणी यशस्वी झाली आहे. आता या मार्गात येणाऱ्या सर्वात मोठ्या कुंठेफळ येथील मेहेकरी ब्रीजचे काम पूर्ण झाले आहे. आता सोलापूरवाडी ते आष्टी या 32 किमी अंतराची चाचणी 17 तारखेला घेण्यात येणार आहे. दरम्यान अहमदनगर ते कड्यापर्यंत रेल्वे धावल्याने बिडकरांच्या आशा पल्लवित झाले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission: 'मतचोरीच्या खोट्या आरोपांना निवडणूक आयोग घाबरत नाही',: मुख्य निवडणूक आयुक्त

Vaishno Devi Yatra: वैष्णो देवीची यात्रा पूर्णपणे थांबवली, भाविकांना परत जाण्याचे आवाहन; नेमकं कारण काय?

Maharashtra Live News Update: पेशवे जयंतीनिमित्त रॅली मध्ये सहभाग घेत खासदार मेधा कुलकर्णी यांनी चालवली दुचाकी

Priya Bapat: प्रिया बापटचा स्पेशल बॉसी लूक; लवकरच झळकणार नव्या भूमिका

Asia Cup 2025 : आशिया कपसाठी पाकिस्तानी संघाची घोषणा, PCB चा बाबर आझम-मोहम्मद रिझवानला धक्का

SCROLL FOR NEXT