Vegetable farming success story of Nanded farmer 
महाराष्ट्र

३ लाखांची गुंतवणूक, ८ लाखांचा नफा! पावणेदोन एकरात दोडक्याने चमकवलं नशीब; वाचा नांदेडच्या प्रकाशची यशोगाथा

Vegetable farming success story of Nanded farmer : नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला फाटा देत दोडका लागवडीतून मोठे यश मिळवले आहे. अवघ्या ३ लाखांच्या खर्चातून सुमारे ८ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळाल्याचा अंदाज असून हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Namdeo Kumbhar

संजय सुर्यवंशी, नांदेड प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Vegetable farming success stories India : पारंपरिक शेतीला फाटा देत भाजीपाला उत्पादनातून आर्थिक प्रगती साधण्याचा यशस्वी प्रयोग नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील रोडगी येथील एका (Ridge gourd farming profit) शेतकऱ्याने करून दाखवला आहे. प्रकाश सीतापराव असे या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव असून, गेल्या २१ वर्षांपासून ते सातत्याने दोडक्याचे उत्पादन घेत आहेत. यामधून यंदा त्यांना ८ लाखांचा नफा मिळण्याचा अंदाज आहे. (Modern vegetable farming techniques)

शेती म्हटली की खर्च आलाच! प्रकाश सीतापराव यांनी यंदा आपल्या शेतातील पावणेदोन एकरमध्ये दोडक्याची लागवड केली. या पिकासाठी प्रकाश यांना जवळपास ३ लाख रुपये खर्च आला. पण आज त्यांच्या कष्टाला फळ मिळतंय. सध्या दोडक्याची तोडणी जोरात सुरू आहे. व्यापाऱ्यांची बांधावरच गर्दी होतेय आणि खर्च वजा जाता ८ लाख रुपयांचा निवळ नफा त्यांना अपेक्षित आहे.

प्रकाश सीतापराव यांच्या दोडक्याला तेलंगणा राज्यातून मोठी मागणी आहे. भोकर येथील व्यापारी थेट त्यांच्या शेतातून माल खरेदी करत आहेत. तेलंगणातील विविध जिल्ह्यांमध्ये विक्रीसाठी पाठवला जात आहे. प्रकाश सीतापराव यांनी भाजीपाला शेतीत मिळवलेले यश पाहून अर्धापूर तालुक्यातील इतर शेतकरीही आता दोडका लागवडीकडे वळू लागले आहेत. यंदाचा ३ लाखांचा सर्व खर्च वजा जाता, दोडक्याच्या उत्पादनातून त्यांना सुमारे ८ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळेल, अशी आशा आहे. कष्टाची जोड आणि योग्य नियोजनाच्या जोरावर सीतापराव यांनी आपली आर्थिक उन्नती साधली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather : महाराष्ट्रासाठी पुढील ५ दिवस महत्त्वाचे, उष्णेतची तीव्र लाट येणार; अकोल्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान चाळीशी पार

Asha Bhosle Funeral: आशा भोसले यांच्या आठवणींनी भारावला सचिन तेंडुलकर, अंत्यदर्शनावेळी अश्रू अनावर

Marathi Actress Photoshoot: डोक्यावर टोपी आणि डोळ्याला गॉगल, मराठमोळ्या अभिनेत्रीचं समुद्रकिनारी हटके फोटोशूट

Maharashtra News Live Update: दिल्ली विधानसभेला बॉम्बने उडवून देण्याचा ईमेल

HSRP Number Plate: वाहनधारकांनो, हे काम आताच करा, अन्यथा बुधवारपासून PUC मिळणार नाही, HSRP बाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT