School Uniform Saam Tv
महाराष्ट्र

Free School Uniform: शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, सरकार सर्वांनाच देणार मोफत गणवेश

Latest News: यावर्षीपासून राज्य सरकारकडून खुल्या गटातील विद्यार्थ्यांनाही मोफत गणवेश देण्यात येणार आहे.

Priya More

Mumbai News: शालेय विद्यार्थ्यांसाठी (School Student) आनंदाची बातमी आहे. या वर्षीपासून राज्यातील सर्व सरकारी (Maharashtra Government) शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात येणार आहे. सरकारी शाळांमध्ये मोफत दिला जाणारा गणवेश (School Uniform) राज्यस्तरावर खरेदी करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे.

आतापर्यंत राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांतील राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, बूट आणि साहित्य देण्यात येत होते. पण यावर्षीपासून खुल्या गटातील विद्यार्थ्यांनाही मोफत गणवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारी शाळांमध्ये (Government School) शिकणाऱ्या खुल्या गटातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सरकारला राज्यातील सर्व सरकारी शाळांचा गणवेश एकाच स्वरुपाचा करावा लागणार आहे. या कामासाठी अवघ्या दीड महिन्यांचा कालावाधी सरकारच्या हातामध्ये आहे. सध्या शालेय विद्यार्थ्यांचा गणवेश कसा असावा यावर विचार केला जात आहे. नंतर कापड खरेदीची निविदा, त्यानंतर गणवेश शिवून घेणे आणि हे गणवेश राज्यातील सर्व सरकारी शाळांमध्ये पोहोचवणे अशी ही संपूर्ण प्रक्रिया असणार आहे. ही प्रक्रिया नवीन सेशन सुरु होण्यापूर्वी म्हणजेच दीड महिन्यांत सरकारला पूर्ण करावी लागणार आहे.

यापूर्वी शाळांना सरकार पैसे वाटप करायचे. या शाळांच्या व्यवस्थापन समिती किंवा संस्था आपल्या स्तरावर कापड खरेदी करुन विद्यार्थ्यांना गणवेश देत होते. या शाळा पातळीवर गणवेश कसा असावा हे ठरवले जात होते. बऱ्याच शाळांमधील विद्यार्थीच गणवेशाचा कलर ठरवत होते. त्यासाठी मतदानासारखे उपक्रम देखील राबवले जात होते. पण आता राज्यस्तरावरुन विद्यार्थ्यांचा गणवेश तयार केला जाणार आहे. त्यानंतर हा गणवेश विद्यार्थ्यांना वाटप केला जाणार आहे. त्यामुळे यापुढे राज्यभरातील सर्वच सरकारी शाळांचा गणवेश हा एकाच स्वरुपाचा पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, राज्यातील सर्वच शाळांना उन्हाळी सुट्टी लागली आहे. राज्यातील सर्व साळा या 15 जूनला सुरु होणार आहेत. त्यापूर्वीच राज्यभरातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे गणवेश पोहोचणे गरजेचे आहे. यासाठी सरकारच्या हातामध्ये आता फक्त दीड महिन्याचा कालावाधी शिल्लक आहे. या कमी कालावधीत विद्यार्थ्यांचा गणवेश तयार करणे गरजेचे आहे. जर हे गणवेश वेळेत तयार होऊन शाळांमध्ये पोहचले नाही तर पुन्हा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे गणवेश जलद गतीने तयार करुन वाटप करण्याचे काम सरकारला पूर्ण करावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Online Shopping: चुकूनही या 3 वस्तू ऑनलाईन खरेदी करू नका , पैसे जातील वाया

Gulab Jamun Recipe: तोंडात टाकताच विरघळणारा खव्याचा गुलाबजाम कसा बनवायचा? वाचा ही सिक्रेट रेसिपी

Maharashtra Live News Update : ऐन सणासुदीचा काळात सातपुड्यातील चांदसैली बनला मृत्यूचा घाट

मुंबई -पुणे मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७-८ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा|VIDEO

Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला करा हे 5 लक्ष्मी उपाय, कर्ज आणि आर्थिक अडचणी होतील दूर

SCROLL FOR NEXT