दिवाळी सणानिमित्त राज्य सरकारने महिलांसाठी एक भन्नाट योजना आणली आहे. आतापर्यंत रेशनकार्डवर अन्नधान्य मिळत होते. मात्र आता प्रत्येक महिलेला साडी देखील मिळणार आहे. राज्य सरकारच्या वस्त्रोद्योग विभाने याबाबत निर्णय घेतलाय. या निर्णयाचा लाभ लाखो महिलांना घेता येणारे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
राज्यातील फक्त अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना या योजनेचा लाभ मिळाणार आहे. दर वर्षी एका कुटुंबात असलेल्या प्रमुख महिलेला ही साडी दिली जाणारे. राज्यात विविध सण उत्सव साजरे केले जातात. त्यापैकी राज्य शासन कोणताही एक सण निश्चित करणार असून त्या दिवशी साडीचे वाटप करणार आहे.
राज्य शासनाकडून मिळणार निधी
राज्य यंत्रमाग महामंडळ संस्थेमार्फत महिलांसाठी ही योजना राबवली जातेय. महामंडळ साल २०२३-२४ या वर्षाकरिता एक साडी ३५५ रुपयांना खरेदी करणारे. यामध्ये साड्यांचे उत्पादनापासून वाहतुकीपर्यंत आणि जाहिरातीसह प्रसिद्धी, साठवणूक यांसाठी येणारा सर्व खर्च राज्य शासनाकडून महामंडळाला दिला जाणारे.
योजनेचा कालावधी किती?
वस्त्रोद्योग विभागाकडून आपले शाश्वत धोरण जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये योजनेचा फायदा २०२३ ते २०२८ या कालावधीत घेतला जाईल. अंत्योदय शिधापत्रिका म्हणजेच पिवळे आणि केशरी रेशनकार्ड धारक व्यक्ती. राज्यात एकूण २४ लाख ५८ हजार ७४७ इतकी कुटुंबे अंत्योदय शिधापत्रिका वापरतात. ज्या व्यक्तींकडे हे कार्ड आहेत त्यांच्या घरातील महिलेला वर्षातून एकदा सुंदर साडी मिळणारे.
अनेक घरांना अद्याप आनंदाचा शिधा मिळाला नाही
दिवाळी सणामुळे राज्यात शासनामार्फत आनंदाचा शिधा वाटण्याचे काम सुरू आहे. आता दिवाळीला सुरूवात झाली असूनही अद्याप काही घरांमध्ये आनंदाचा शिधा पोहचलेला नाही. सरकारने सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्यासाठी दिलेला आनंदाचा शिधा घेण्यासाठी नागरीकांना तासंतास ताटकळत उभं रहावं लागत आहे.
ऐन दिवाळीत सर्व कामे सोडून नागरिक रेशन दुकानाच्या बाहेर उभे असलेले दिसताहेत. ऑनलाईन रजिस्टेशन झाल्याशिवाय शिधा देता येत नाही आणि सर्वर चालत नसल्याने अहमदनगर जिल्ह्यातील अनेक रेशन दुकानावर नागरीक तासंतास उभे असलेले बघायला मिळताहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.