Sant Gadge Baba Amravati University saam tv
महाराष्ट्र

Sant Gadge Baba Amravati University : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना, अनाथांना मोफत शिक्षण; संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा निर्णय

Amravati Latest Maratih News : अमरावती विद्यापीठाच्या परीक्षेत्रात 423 महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले.

Siddharth Latkar

- अमर घटारे

Sant Gadge Baba Amravati University News :

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना व अनाथांना मोफत शिक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने घेतला आहे. या निर्णयाची अमंलबजावणी पुढील शैक्षणिक वर्षापासून लागू हाेणार असल्याची माहिती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मिलिंद बारहाते यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. (Maharashtra News)

अमरावती विभाग आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा विभाग म्हणून ओळखला जातो. सन 2001 पासून 2023 पर्यंत या 23 वर्षात 20 हजार 66 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. सन 2023 या एका वर्षात 1151 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.

आत्महत्या केल्यानंतर अनेक शेतकऱ्यांची मुलं कॉलेजची फी व परीक्षा फी न भरू शकल्याने शिक्षणा पासून वंचित राहिलेले आहेत. अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्राचार्य सुभाष गवई यांनी अनाथ मुलांना तर दुसरे सिनेट सदस्य कैलास चव्हाण यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना विद्यापीठाने मोफत शिक्षण द्यावे हा प्रस्ताव विद्यापीठास दिला. विद्यापीठाच्या दोन्ही प्राधिकरणात हा प्रस्ताव मंजूर झाला. आता पुढच्या सेशन पासून लागू केला जाणार आहे. सध्या हा प्रस्ताव एका समितीकडे पाठवण्यात आलेला आहे.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना व अनाथ मुलांना मोफत शिक्षण देणारे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ राज्यातीलच नव्हे तर देशातील एकमेव विद्यापीठ आहे. अमरावती विद्यापीठाच्या परीक्षेत्रात 423 महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. या निर्णयाचे विद्यार्थ्यानी स्वागत केले आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अमरावती विभागात 2001 ते 2023 एकूण शेतकरी आत्महत्या : 20,066

2023 या वर्षात एकूण शेतकरी आत्महत्या : 1151

गेल्या 5 वर्षात शेतकरी आत्महत्या : 5726

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

today horoscope: आज तुम्हाला अचानक… राशीत काय? चांगलं की वाईट?

Raj Thackeray: मतभेदांपेक्षा महाराष्ट्र महत्वाचा; भर सभेत राज ठाकरे यांची भावनिक साद

kiwi Benefits: किवी फळाचे असंख्य फायदे!

VIDEO : पावसात सभा झाल्यावर निवडून येतात; भाषणावेळी पाऊस आला, फडणवीसांचा शरद पवारांना टोला

Champions Trophy: टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार का दिलाय? समोर आलं खरं कारण

SCROLL FOR NEXT