भिशीच्या नावाखाली 5 कोटी 88 लाख रुपयांची फसवणूक गुन्हा दाखल
भिशीच्या नावाखाली 5 कोटी 88 लाख रुपयांची फसवणूक गुन्हा दाखल Saam TV
महाराष्ट्र

भिशीच्या नावाखाली 5 कोटी 88 लाख रुपयांची फसवणूक गुन्हा दाखल

मंगेश कचरे

पुणे: इंदापूर शहरात पाच जणांनी भिशीच्या नावाखाली पाच कोटी 88 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी इंदापूर पोलिसांनी (Police) पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान फसवणुकीची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इंदापूर शहरात भिशीमध्ये पैसे गुंतवलेल्या सामान्य मजूरांपासून ते व्यवसायिकापर्यंतच्या शेकडो जणांची मोठी फसवणूक झाल्याचे समोर येऊ लागले आहे.

शहर शिवसेनेने यामध्ये लक्ष घातल्यानंतर पोलिसांनी गांभीर्याने तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून, हा घोटाळा 30 कोटीपर्यंतचा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर शहरांमध्ये याहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक झाली असण्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान या प्रकरणी आतापर्यंत संदीप चित्तरंजन पाटील यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: २० वर्षांनी 'राज'योग! ठाकरे-नारायण राणे २ दशकांनंतर एकाच व्यासपीठावर

Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये पुन्हा ट्विस्ट, शांतिगिरी महाराजांसह ६ जणांचे उमेदवारी अर्ज अवैध, पण...

Today's Marathi News Live : कुणाला मालक होऊ देऊ नका मी तुमचा सेवक आहे: संजय पाटील

Maharashtra Politics 2024 : डब्बे नसलेल्या इंजिनमध्ये फक्त ड्रायव्हर बसतो; देवेंद्र फडणवीस यांची इंडिया आघाडीवर बोचरी टीका

Rashi Parivartan Effect: गुरुचे बळ वाढलं; २०२५ पर्यंत ‘या’ राशींना मालामाल होण्याची संधी

SCROLL FOR NEXT