akola politics  Saam tv
महाराष्ट्र

4 टर्म भाजप नगरसेवक,यंदा तिकीट कापलं; ऐनवेळी ठाकरे गटाकडून उमेदवारी, अकोल्यात नेमकं काय घडलं?

akola political News :तब्बल 4 टर्मपासून भाजपचे नगरसेवक असलेल्या विजय इंगळे यांचं तिकीट ऐनवेळी भाजपने कापलं. नाराज झालेल्या विजय इंगळे यांची शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश. पक्षाशी गद्दारी केलेल्या विजय अग्रवालांच्या हातात भाजपची सुत्रे असल्याचा विजय इंगळेंचा आरोप.

Vishal Gangurde

४ टर्म नगरसेवक असलेल्या इच्छुक उमेदवार विजय इंगळे यांचं तिकीट भाजपने कापलं

विजय इंगळे यांच्या ऐवजी नवख्या व्यक्तीला दिली उमेदवारी

विजय इंगळे यांचे माजी महापौरावर गंभीर आरोप

अक्षय गवळी, साम टीव्ही

अकोला महापालिकेच्या राजकारणातील भाजपमधलं मोठं नाव असलेल्या विजय इंगळे यांचं तिकीट भाजपने कापलंय. प्रभाग क्रमांक 20 मधून त्यांच्या ऐवजी पक्षाने नवख्या व्यक्तीला उमेदवारी दिलीये. त्यामुळे नाराज झालेल्या विजय इंगळे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करत उमेदवारी दाखल केलीये. विजय इंगळे आणि कुटुंबीय महापालिकेच्या स्थापनेपासून महापालिकेत नगरसेवक म्हणून सातत्याने विजयी होत आहेत.

स्वतः विजय इंगळे, त्यांच्या आई आणि पत्नी या महापालिकेत भाजपच्या नगरसेवक राहिल्यायेत. अकोला शहरात भाजपचा नेतृत्व निष्ठावंतांच्या हातून गेल्याने निष्ठावंतांचे हाल केले जात असल्याचा गंभीर आरोप विजय इंगळे यांनी केलाय. या संदर्भात त्यांनी भाजपचे निवडणूक प्रमुख आणि माजी महापौर विजय अग्रवाल यांच्यावर गंभीर आरोप केलेयेत.

विजय अग्रवाल यांनी पक्षाशी गद्दारी केल्यानंतर ही पक्षाने त्यांना महापौर, स्थायी समिती सभापती आणि आमदारकीचे तिकीट दिलंय. मात्र, आपल्यासारख्या निष्ठावंतांवर तिकीट कापत भाजपने अन्याय केल्याचा आरोप विजय इंगळे यांनी केलाय. 2012 मध्ये विजय अग्रवाल यांच्यामुळेच आपल्या पत्नीचा महापौरपदाच्या निवडणुकीत पराभव झाल्याचा आरोप त्यांनी केलाय.

कोण आहेत विजय इंगळे?

आंबेडकरांचा गड असलेल्या अकोल्यात भाजपचा बौद्ध आणि दलित चेहरा.

2002 मधील पहिल्या महापालिकेत विजय इंगळे 21 व्या वर्षी नगरसेवक.

त्यानंतर इंगळे यांच्या आई आणि पत्नी खुल्या जागेवरून नगरसेविका.

2012 मध्ये विजय इंगळे यांच्या पत्नी करूणा इंगळे यांचा महापौरपदाच्या निवडणुकीत 3 मतांनी पराभव.

यावेळी विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वात भाजपच्या 3 बंडखोरांनी भाजप विरोधात केलं होतं मतदान.

2017 मध्ये विजय इंगळे परत महापालिकेत विजयी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Politics: गुंडाच्या परिवारावर अजितदादा मेहरबान; गुंडांच्या बायका निवडणुकांच्या मैदानात

BMC Election: ठाकरेंच्या मतदारसंघात असंतोषाचा भडका; निवडणुकीत पत्ता कट, नाराजांच्या कोलांट उड्या

Vande Bharat sleeper Train: जबरदस्त! वंदे भारत ट्रेनचा १८० किमीचा स्पीड, सुसाट वेगातही पाण्याचा ग्लास राहिला जशास तसा; Water Taste व्हिडिओ व्हायरल

RPI चा अपमान, रामदास आठवलेंचा संताप; नाराजीनंतर भाजपची धावाधाव, VIDEO

ऐन निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा हार्ट अटॅकने मृत्यू; राजकीय वर्तुळात शोककळा

SCROLL FOR NEXT