Jail Birthday Saam TV
महाराष्ट्र

भाईचा बर्थडे जेलमध्ये साजरा करणं पोलिसांच्या अंगलट; चार जण निलंबित

जेलमध्ये असणाऱ्या आरोपींचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लागणारा केक आणि साहित्य जेलमध्ये गेलंच कसं?

गोविंद साळुंके, साम टीव्ही, शिर्डी

अहमदनगर : अहमदनगरच्या संगमनेर शहर पोलिस ठाण्यात (Sangamner city police Station) असलेल्या जेलमध्ये आरोपींनी वाढदिवस साजरा केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अहमदनगर जिल्हा (Ahmednagar District) पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील चार पोलिसांना निलंबित केलं आहे. मागील आठ दिवसापूर्वी आरोपींनी जेलमध्ये इतर कैद्यासमोवेत वाढदिवस साजरा केला होता.

याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रविंद्र कुलकर्णी, पोलीस हवालदार आनंदा भांगरे,पोलीस नाईक रामदास भांगरे,पोलीस हवालदार संजय साबळे, यांचं जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी निलंबन करून सेवेतून बडतर्फ केलं आहे.

दरम्यान, संगमनेर शहर पोलिस स्टेशनमधील जेलमध्ये असणाऱ्या आरोपींनी वाढदिवस साजरा करण्यासाठी वाढदिवसासाठी लागणारा केक आणि साहित्य जेलमध्ये गेलंच कसं याचा ठपका या चार पोलिसांवर ठेवत त्या पोलिसांचं निलंबन करून सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. पोलिसांचं निलंबन झाल्यामुळे संगमनेर पोलिस दलामध्ये खळबळ उडाली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

Sushil Kedia: ठाकरेंची माफी मागून केडियानं पुन्हा पलटी मारली; म्हणाला 'काय बोललो याचा पश्चाताप नाही'

CHYD : 'चला हवा येऊ द्या' महाराष्ट्राला खळखळून हसवायला सज्ज; कॉमेडीचं गँगवॉर 'या' दिवसापासून सुरू, पाहा VIDEO

दारूचे पैसे न दिल्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण; घटना CCTVत कैद

Bus Accident : भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस १५ फूट खोल नदीत कोसळली, दोन जणांचा मृत्यू, २५ जण जखमी

SCROLL FOR NEXT