मावळ तालुक्यातील चार पोलीस ठाण्यांचा होणार पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात समावेश ? SaamTv
महाराष्ट्र

मावळ तालुक्यातील चार पोलीस ठाण्यांचा होणार पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात समावेश ?

मावळ तालुक्यातील लोणावळा शहर, लोणावळा ग्रामीण, कामशेत आणि वडगाव मावळ या चारही पोलीस ठाण्याचा पिंपरी चिंचवड आयुक्तालयात समावेश करावा असा प्रस्ताव पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी पोलीस महासंचालकांकडे पाठविला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिलीप कांबळे

मावळ : तालुक्यातील लोणावळा शहर, लोणावळा ग्रामीण, कामशेत आणि वडगाव मावळ या चारही पोलीस ठाण्याचा पिंपरी चिंचवड आयुक्तालयात समावेश करावा असा प्रस्ताव पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी पोलीस महासंचालकांकडे पाठविला आहे. थोडक्यात काय तर पिंपरी चिंचवड आयुक्तालयाची हद्द पुणे जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या खंडाळ्यापर्यत वाढविण्याचा आयुक्तांचा प्रयत्न आहे. Four police stations in Maval taluka to be included in Pimpri-Chinchwad Commissionerate

हे देखील पहा -

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी पोलिस महासंचालक यांच्याकडे पाठविलेल्या प्रस्तावावर संबंधिताकडून तात्काळ अभिप्राय महासंचालक कार्यालयाने मागविला आहे. मावळ मधील शहरीकरण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. जमिनीचे व्यवहार करणारे लँड माफिया, महामार्गावर मोठ्या प्रमाणात होणारी लूट व गँगवार वाढले आहे. तेथील पोलीस अधिकाऱ्यांना दंडाधिकारी अधिकार देण्यासाठी ही पाऊले उचलली जात आहेत.

त्यामुळे गुंडगिरीला आळा बसून एक प्रकारे अंकुश ठेवता येईल. लोणावळा हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक सोबत गुन्हेगारही येतात येथील जनतेला यापासून धोका होऊ नये यासाठी पिंपरी चिंचवड आयुक्त कार्यालयात याचा समावेश करण्यात येण्याचा प्रस्ताव आहे. दरम्यान पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणात गुंडगिरी वाढलेली आहे आणि हीच गुंडगिरी थांबवण्यासाठी हा प्रस्ताव तयार केलेला आहे.

मावळ मधील चार पोलिस ठाण्यांचा पिंपरी चिंचवड आयुक्त कार्यालयात समावेश करताना सुरवातीला इथल्या चौकी सुधाराव्यात इथे नवीन कार्यक्षम  अधिकारी आणावेत ज्यामुळे मावळ मधील गुन्हेगारी वाढणार नाही. आमच्या गावचा समावेश करत असताना लोणावळ्यातील ग्रामीण भागातून पिंपरीचे अंतर चाळीस किलोमीटर आहे. पिंपरी चिंचवडला जायचे त्यानंतर तिथं वाट बघायची, वेळ घालवायचा त्यापेक्षा लोणावळ्यात अधीक्षक कार्यालय आहे तिथेच आमचे प्रश्न सुटू शकतात. मावळ मधील चारही पोलिस ठाण्यांचा समावेश करण्याला विरोध असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

मावळ मधील चार पोलीस स्टेशनचा समावेश पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कार्यालयात समाविष्ट करण्यास स्थानिकांचा विरोध आहे. लोणावळ्यातील सर्वात शेवटचे टोक असलेल्या सावळा हे गाव पोलिस आयुक्त कार्यालयात समाविष्ट होणार मात्र त्या नागरिकाला पिंपरीला जाण्यासाठी तीनशे ते चारशे रुपये खर्च येणार आहे. त्यानंतर सरकारी काम आणि सहा महिने थांब. अशी परिस्थिती होण्याची शक्यता आहे.

स्थानिक पोलिसांची आम्हाला मदत होऊ शकते मात्र पिंपरीला जाणे हे मान्य नाही. आयुक्त कार्यालयात गेलात तर आधी वेटींग नंतर मीटिंग आणि नंतर सेटिंग अशा पद्धतीच्या सर्व भूमिका सगळीकडे असल्यामुळे तो सर्वात जास्त मनस्ताप आमच्या सामान्य नागरिकांना होणार आहे. दरम्यान यामागे कुठलं तरी मोठं तरी षडयंत्र असल्याच संतोष जांभूळकर यांनी सांगितले आहे. असे झाल्यास आम्ही सर्व सरपंच आणि नागरिकांना घेऊन आंदोलन करू असे देखील ते म्हणाले.

पिंपरी चिंचवड आयुक्त कार्यालयात लोणावळा, लोणावळा ग्रामीण, कामशेत आणि वडगाव या गावांचा समावेश करण्याचा घाट आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी घातलेला आहे. सरपंचांना आदेशही देण्यास सुरुवात झाली आहे. मात्र सरपंच, मावळ मधील जनता या प्रस्तावास विरोध करीत आहे.लोणावळामध्ये राज्यातून परराज्यातून पर्यटक येतात यात एखादी मोठी घटना घडली तर त्यांना पिंपरी चिंचवड आयुक्त कार्यालयात येणे शक्य होणार नाही. लोणावळा येथे अधीक्षक कार्यालय आहे. तिथे आपले प्रश्न सुटू शकतात पिंपरी चिंचवड शहरात याचा समावेश करून नक्की काय साधणार असा प्रश्न स्थानिक विचारू लागले आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : हिंगोलीत अपक्ष उमेदवार रामदास पाटील सुमठाणकर आघाडीवर

Horoscope Today: तूळ राशीच्या लोकांना आज जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल, वाचा तुमचे राशिभविष्य

Assembly Election Results : भाजप कार्यालयाबाहेर जय्यत तयारी, पाहा Video

Horoscope Today: कोणत्या राशींसाठी आजचा दिवस असेल भाग्यशाली, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT