sangli accident news, police, vita - mahableshwar highway saam tv
महाराष्ट्र

Vita - Mahabaleshwar Highway : विटा- महाबळेश्वर महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील चाैघे ठार

या अपघाताची माहिती कळताच पाेलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

विजय पाटील

Sangli Accident News : विटा- महाबळेश्वर राज्य मार्गावर ट्रॅव्हल्स आणि कार या दाेन वाहनांत आज (गुरुवार) सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात चार जण जागीच ठार झाले. यामध्ये एक महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. या अपघातातून सदानंद दादोबा काशीद हे बचावले असून ते जखमी झाले आहेत. (Maharashtra News)

घटनास्थळावरुन आणि पाेलिसांकडून मिळालेली माहिती अशी - आज सकाळच्या सुमारास विटा महाबळेश्वर राज्य मार्गावरून साताराच्या दिशेने विट्याकडून ट्रॅव्हल्स निघाली होती. त्याचवेळी साताराकडून येणारी कार विटाच्या दिशेने येत होती. शिवाजीनगर परिसरातील अकरा मारुती मंदिराच्या पुढे उताराच्या ठिकाणी वाहनांची धडक झाली.

ही धडक इतकी भीषण हाेती की कारचा पूढच्या भागाचा चक्काचूर झाला. या कारमध्ये एकूण पाच जण प्रवासी हाेती. त्यातील चाैघांचा मृत्यू झाला आहे. हे चौघेही तासगाव तालुक्यातील गव्हाण येथील काशीद कुटुंबातील आहेत. दरम्यान चालकाच्या बाजूला बसलेली व्यक्ती अपघातानंतर एअर बॅग उघडलयाने बचावल्याचे पाेलिसांनी सांगितले.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार या अपघातात सुनीता सदानंद काशीद, चंद्रकांत दादाबो काशीद, अशोक नामदेव सुर्यवंशी (सर्व रा. गव्हाण, ता. तासगांव) आणि मालाड (मुंबई) येथील बदली गाडी चालक योगेश कदम हे जागीच ठार झाले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्याला रेड अलर्ट, घाट भागात कोसळधार; हवामान विभागाचा अंदाज

Shahada Police : प्रायव्हेट खोल्या, सोफ्यावर कंडोम; शहाद्यात अवैध कॅफेवर पोलिसांचा छापा

अमेरिकेत पुराचा हाहाकार! 50 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; पाहा VIDEO

Mahadev Temple: शिवमंदिरात महिलांनी केव्हा जावे? जाणून घ्या योग्य वेळ

Valheri Waterfall: मुसळधार पावसामुळे वाल्हेरी धबधब्याचे सौंदर्य खुलले; पर्यटकांची प्रचंड गर्दी| VIDEO

SCROLL FOR NEXT