11 वर्षीय मुलीला फूस लावून कौमार्याचा सौदा करणाऱ्या महिलांना केल गजाआड Saam Tv
महाराष्ट्र

11 वर्षीय मुलीला फूस लावून कौमार्याचा सौदा करणाऱ्या महिलांना केल गजाआड

नागपुरात सामाजिक सुरक्षा विभागाच्या सतर्कतेमुळे एका ११ वर्षीय बालिकेला देहव्यापराच्या दलदलीत फसण्यापासून वाचविण्यात आलं

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मंगेश मोहिते

नागपुर : नागपुरात सामाजिक सुरक्षा विभागाच्या सतर्कतेमुळे एका ११ वर्षीय बालिकेला देहव्यापराच्या दलदलीत फसण्यापासून वाचविण्यात आलं आहे. देह व्यापाराच्या आरोपात आधीच जेलमध्ये जाऊन आलेल्या महिलेने परत एकदा तोच प्रकार करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, आता केलेला प्रकार चीड आणणारा आहे.

चक्क आपल्या ओळखीतल्या महिलेला माझ्या २ वर्षाच्या मुलाचा वाढ दिवस आहे. त्यासाठी मी तुझ्या मुलीला माझ्याकडे घेऊन जाते, असे सांगून 11 वर्षीय बलिकेचा आपल्या घरी आणलं. आणि आपल्या परिचित ग्राहकांना मेसेज दिला. 11 वर्षीय बालिका आहे. तीच कौमार्य विकायचं आहे. ४० हजार लागतील.

हे देखील पहा-

मात्र, याची भनक गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला लागली होती. त्यांनी हा प्लान रचला आपला बनावट ग्राहकाच्या माध्यमातून संपर्क साधला. ४० हजार रुपयांत सौदा ठरला, बनावट ग्राहक त्याठिकाणी गेला आणि महिलेला पैसे दिले. तिने एक रूम देऊन मुलीला पाठविले आणि फंटर ने इशारा करताच पोलिसांनी धाड टाकली आहे.

यात ३ महिलांना पोलिसांनी अटक केली आणि त्या निरागस बलिकेची सुटका करण्यात आली आहे. देह व्यापाराचा व्यवसाय करून पैसे कमविण्यासाठी चक्क 11 वर्षाच्या बलिकेचा वापर होता. पोलिसांनी वेळीच त्या बालिकेला वाचविल आहे. मात्र, समाजात महिलाच अश्या कृत्यांना चालना देत असेल, तर म्हणायचं तरी काय हा प्रश्न निर्माण झाला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : उल्हासनगरमध्ये ऑफिस खुर्ची बनवणाऱ्या कारखान्याला मध्यरात्री भीषण आग

BMC elections : मी मोदींचा भक्त, मुंबईवर भाजपचं कमळ फुलणारच, महेश कोठारे काय म्हणाले?

Fact Check : पंतप्रधान मोदी देणार 5 हजारांचं गिफ्ट? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? VIDEO

Diwali 2025 Shani Vakri: दिवाळीला बऱ्याच वर्षांनी होणार शनी वक्री; 'या' राशींना मिळणार शनीचा आशिर्वाद

Shaniwarwada Namaz Row: नमाजपठणवरुन महायुतीत जुंपली; मेधाताईंना अटक करण्याची ठोंबरेंची मागणी

SCROLL FOR NEXT