Yavatmal online fraud case saam tv
महाराष्ट्र

सावधान ! डोळ्यांच्या लेन्ससाठी फ्रॅंचाईजी घेताय? महिलेचं बॅंक खातं रिकामं झालं, पण...

गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईनच्या माध्यामातून पैशांचा व्यवहार करणाऱ्यांना गंडा घालण्याचे सत्र सुरुच आहे.

साम टिव्ही ब्युरो

यवतमाळ : गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईनच्या माध्यामातून पैशांचा व्यवहार (online fraud crime) करणाऱ्यांना गंडा घालण्याचे सत्र सुरुच आहे. यवतमाळ शहरातील दर्डा नगर परिसरात राहणाऱ्या एका महिलेची ४४ लाख १ हजार आठशे रूपयांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. प्रतिभा प्रविण इंगळे असं फसवणूक झालेल्या महिलेचं नाव आहे. सदर महिलेने डोळ्यांच्या लेन्सची एजन्सी (Eye lenses Agency) घेऊन आर्थिकदृष्ट्या नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या एंजन्सीद्वारे पैसे कमावण्याऐवजी त्या महिलेलाच लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी प्रतिभा इंगळे या महिलेनं अवधूतवाडी पोलीस स्टेशनमध्ये (Police) धाव घेवून तक्रार दिली आहे. याप्रकरणी फरिदाबाद येथील पुलकीत कपूरवर पोलिसांनी गु्न्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या दिवसेंदिवस डोळ्यांचा आजार सातत्याने वाढत आहेत.अशात डोळ्यांच्या लेन्सच्या मागणीतही वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रतिभा इंगळे या महिलेनं लेन्सची एजन्सी घेतली. प्रतिभा लेन्स कार्ड सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची एजन्सी घेण्याकरिता स्वतःच्या मोबाईलवरून गुगलवर सर्च केले.

त्यानंतर महिलेल्या फोनवर पुलकीत कपूर नावाच्या एका व्यक्तीचा फोन आला. मी कंपनीचा प्रतिनिधी बोलत आहे, आपल्याला कंपनीची फ्रॅंचाईजी देतो. त्यासाठी मशनरी, इंटिरिअर फर्निचर व सर्व गोष्टींसाठी तुम्हाला आधीच पेमेंट करावा लागेल, असं कपूरने त्या महिलेला फोनवर सांगितलं. त्यानंतर प्रतिभाने पाच लाख, दहा लाख रुपयांचे वेगवेगळे व्यवहार करुन एकूण ४४ लाख १ हजार ८०० रुपये अकाऊंट मध्ये ट्रान्सफर केले.

त्यानंतर प्रतिभाने एजन्सीबाबत विचाारणा केली असता कपूरने कोणाताही प्रतिसाद दिला नाही. त्याने उडवाउडवीची उत्तरे देत फोन नंबर बंद केला. त्यानंतर प्रतिभाला फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांत धाव घेतली. फरिदाबाद येथील पुलकीत कपूरवर पोलिसांनी गु्न्हा दाखल केला आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुणे महापालिकेच्या मतदार यादींवर हरकतींचा पाऊस

स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवारांची तोफ धडाडली, महाराष्ट्र पिंजून काढला

Raigad Politics: राष्ट्रवादी-शिवसेना संघर्ष टोकाला; मंत्री भरत गोगावले यांच्या मुलावर गुन्हा दाखल

IND vs SA ODI: डोंगराएवढी धावसंख्या करूनही टीम इंडियाचा दारूण पराभव; दक्षिण आफ्रिकेची मालिकेत १-१ ने बरोबरी

आजारपणामुळे ब्रेक घेतलेल्या संजय राऊतांची भेट! कोणकोणत्या राजकीय नेत्यांकडून विचारपूस?

SCROLL FOR NEXT