रुपाली बडवे
मुंबई : भाजप नेते व जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती दिग्विजय सभापती दिग्विजय शिंदे यांनी भाजप पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यानंतर शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात प्रवेश केला आहे. दिग्विजय शिंदे यांच्या प्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.'वडिलांपासून फारकत घेऊन दिग्विजय शिंदे (Digvijay Shinde) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. मित्र पक्षांकडून कोणी येत असेल तर आम्ही नाही म्हणतो, पण भाजपकडून येत असेल तर एक्सप्रेस वे', अशा शब्दात शिंदे यांच्या पक्ष प्रवेशाचे कौतुक जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलं आहे.
जयंत पाटील म्हणाले, 'उस्मानाबाद जिल्ह्याने शरद पवार यांना साथ दिली आहे. उस्मानाबादचे (Osmanabad) राहुल मोटे पराभूत झाले. त्यामुळे झालेली पडझड भरून काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. जिल्ह्यातील विकास कामांना प्राधान्य देणार आहे. २०२४ च्या आधी पाणी पुरवठा करण्यासाठी योजना मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. दिग्विजय शिंदे यांनी गेली अनेक वर्षे भाजपात काम केलं. आलेल्या अनुभवानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश करत आहे. मित्र पक्षांकडून कोणी येत असेल तर आम्ही नाही म्हणून सांगतो, पण भाजपकडून येत असेल तर एक्सप्रेस वे'.
राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते , उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील दिग्विजय शिंदे यांच्या प्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले, 'दिग्विजय शिंदे यांच्यासोबत अनेक सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहे. इतके वर्ष एका पक्षात काम करणे आणि अचानक भूमिका बदलून पक्ष बदलणे हे एक आव्हान आहे. तरी वडील भाजपमध्ये असताना त्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचं ठरवलं आहे. शरद पवार यांच्यासोबत काम करणारे लोक आम्हाला सोडून गेले,काही वैचारिक मतभेद त्यांचे असतील'.
'मात्र, आता ते जरी सोडून गेले तरी त्या ठिकाणचा विकास आपल्याला करायचा आहे. एक तरुण म्हणून धनंजय मुंडे यांचं उदाहरण घ्या. नेतृत्व गुण बघून ते आमदार झाले, मंत्री झाले आणि आता तरुण सहकारी म्हणून आमच्यासोबत आहेत. तीन पक्षाचं सरकार म्हटल्यावर काही नाराजी असते पण सरकार चाललं पाहिजे, आमदारांची नाराजी नसू नये त्यात विकास कामासाठी एकत्रितपणे निर्णय सरकार म्हणून घेतले जातात .प्रत्येक पक्ष त्यामध्ये शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस आपला पक्ष वाढविण्यासाठी काम करत आहे'.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.