संदीप नागरे, साम टीव्ही
हिंगोली: वसमतचे माजी आमदार तथा ज्येष्ठ नेते पंडितराव देशमुख यांचे नांदेड येथे उपचारादरम्यान निधन झाले. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने हिंगोली जिल्हयात शोककळा पसरली आहे. राजकीय क्षेत्रासह शिक्षण क्षेत्रातही त्यांनी मोलाचे योगदान दिले होते. हुतात्मा बहिर्जी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण क्षेत्रात महत्वपूर्ण कार्य केले.
पंडितराव देशमुख यांनी 1977 मध्ये जनता पार्टीच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत विजय मिळवत ते वसमतचे आमदार झाले. मात्र त्यांना आमदार म्हणून केवळ अडीच वर्षांचा कार्यकाळ मिळाला. त्या निवडणुकीत त्यांचे निवडणूक चिन्ह नांगरधारी शेतकरी असे होते.
राजकारण आणि शिक्षण क्षेत्रातील तयांच्या योगदानामुळे त्यांनी परिसरात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनाची बातमी समजताच हिंगोली जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. पंडितराव देशमुख यांच्या पार्थिवावर आज दुपारी 1 वाजता कोठारोड येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.