Sureshkumar Jethaliya death  
महाराष्ट्र

जालन्यातील माजी आमदाराचे निधन, अजित पवारांचे विश्वासू म्हणून ओळख, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हळहळ

jalana Sureshkumar Jethaliya death : परतूरचे माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. जालना जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

Namdeo Kumbhar

अक्षय शिंदे पाटील, जालना प्रतिनिधी

जालन्यातली परतूर विधानसभेचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचं निधन झाले. हृदयविकाराच्या तीव्र झाटक्यानं जेथलिया यांचं निधन झाले. जेथलिया अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे नेते होते. जेथलिया यांच्या निधनाने जालना जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दिवंगत अजित दादा पवार यांचे विश्वासू म्हणून सुरेशकुमार जेथलिया यांची ओळख होती.

जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातील माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय.सुरेशकुमार जेथलिया यांनी परतूर विधानसभा मतदारसंघाचं आमदार म्हणून 2009 साली नेतृत्व केलं.काँग्रेस पक्षानंतर त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता.पहाटेच्या वेळेला त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना जालना येथील खाजगी रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.दरम्यान जेथलिया यांच्या निधनाने परतूर मंठा विधानसभा मतदारसंघावर शोककळा पसरली असून जिल्ह्याच्या राजकीय राजकारणात मोठी पोकळी निर्माण झालीय.

गेल्या वर्षीच त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला होता. पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारीही सोपवली होती. दरम्यान सुरेशकुमार जेथलिया यांच्या निधनामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला जालन्यात मोठा धक्का बसला आहे. आज सकाळी पाच वाजेच्या दरम्यान त्यांना झोपेतच हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचे दुखःद निधन झाले आहेत. 64 व्या वर्षी सुरेश कुमार जेथलिया यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

शिवसेनेकडून 2004 मध्ये विधानपरिषदेवर त्यांची निवड करण्यात आली..

2009 ची परतूर विधानसभेची निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणून लढवली आणि बबनराव लोणीकर यांचा पराभव करत अपक्ष आमदार म्हणून निवडून आले.. त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला..

2024 च्या विधानसभा निवडणुकीत परतुर विधानसभेची जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळाली त्यामुळे सुरेश कुमार जेथलिया यांनी पुन्हा एकदा बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली आणि त्यांचा पराभव झाला..

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत, त्यांनी परतूर मतदारसंघातून बंडखोरी केली होती, त्यानंतर त्यांना काँग्रेस पक्षातून ६ वर्षांसाठी निष्कासित करण्यात आले होते..

त्यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत परतुर येथे सुरेश कुमार जेथलिया यांनी त्यांच्या शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला..

सुरेशकुमार जेथलिया यांचा परतूर शहरावर मोठा प्रभाव होता. तब्बल २५ वर्ष परतूर नगरपालिका त्यांच्या अधिपत्याखाली होती.

परतूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणूनही प्रतिनिधित्व केले होते

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

How Painkillers Work: पेनकिलर घेतल्यानंतर लगेच कशा गायब होतात वेदना? वाचा औषधं पोटात गेल्यावर कसं काम करतं?

Maharashtra News Live Update : उत्तर पुणे जिल्ह्यात तापमान ४२° पार; उष्माघाताचा धोका वाढला

मोठी बातमी! LPG सिलेंडरच्या नियमात मोठे बदल! सामान्यांना दिलासा?

HSC Result 2026 : बारावीच्या निकालाची तारीख अन् वेळ ठरली, mahahsscboard.in वर पाहा रिझल्ट

जाडी बायको असणारे पुरुष आयुष्यात सर्वाधिक आनंदी, नव्या संशोधनात नेमकं काय?

SCROLL FOR NEXT