Datta Meghe Saam Tv
महाराष्ट्र

Datta Meghe: भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचं निधन, वर्ध्यामध्ये आज होणार अंत्यसंस्कार; राजकीय वर्तुळात शोककळा

BJP Leader Datta Meghe Death: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार दत्ता मेघे यांचे निधन झाले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या ८९व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नागपूरमध्ये आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Priya More

Summary -

  • भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे वयाच्या ८९व्या वर्षी निधन

  • नागपूर येथे हृदयविकाराच्या झटक्याने घेतला अखेरचा श्वास

  • पवनार येथे त्यांच्या पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार

  • राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान

विदर्भाचे लोकनेते, सावंगी येथील आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलपती, माजी खासदार दत्ताजी मेघे यांचे निधन झाले. वयाच्या ८९व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नागपूर येथील निवासस्थानी रविवारी रात्री ८ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

दत्ताजी मेघे यांचे पार्थिव नागपूर येथील निवासस्थानी सोमवारी दुपारी १ वाजेपर्यंत तसेच दुपारी २.३० वाजता सावंगी (मेघे) येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर दुपारी ४.३० वाजता दत्ताजी मेघे यांच्या जन्मगाव पवनार येथील शेतात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. दत्ता मेघे यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांना आणि कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला.

दत्ताजी मेघे महाराष्ट्र शासनात राज्यमंत्री तसेच नागपूर, रामटेक आणि वर्धा येथील लोकसभा सदस्य आणि राज्यसभा सदस्यही राहिले आहेत. दत्ता मेघे यांनी नव्या पिढीचे मार्गदर्शक म्हणून नेहमी भूमिका बजावली. त्यामुळे राजकीय पक्षात त्यांचे चाहते आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी शालिनीताई, पुत्र माजी आमदार सागर मेघे, आमदार समीर मेघे आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे.

दरम्यान, माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाने 'दातृत्वाचा धनी' हरपला. शिक्षण संस्थांचे जाळे आणि प्रचंड मोठे सामाजिक कार्य उभे करताना त्यांच्या संपूर्ण राजकारणात सामान्य माणूस हा कायम केंद्रस्थानी असायचा, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. दत्ता मेघे यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक जीवनात कायमच सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवूनच आयुष्यभर ते कार्यरत राहिले. त्यामुळेच एक लोकनेता अशी त्यांची प्रतिमा होती, असे मुख्यमंत्री म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT