Jayant Patil  Saam tv
महाराष्ट्र

Jayant Patil : विधानपरिषदेत ठाकरेंनी तिसरा उमेदवार दिला, त्यामुळे शरद पवारही नाराज; जयंत पाटील यांचं ठाकरे गटावर पराभवाचं खापर

Jayant Patil on MLC Election : विधानपरिषदेत ठाकरेंनी तिसरा उमेदवार दिला, त्यामुळे शरद पवार देखील नाराज झाले, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी पराभवानंतर दिली.

Vishal Gangurde

सचिन कदम, साम टीव्ही प्रतिनिधी

रायगड : विधानपरिषदेची काही दिवसांपूर्वी निवडणूक पार पडली. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत १२ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत काँग्रेसकडून प्रज्ञा सातव, ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर तर शरद पवार गटाकडून शेकापचे जयंत पाटील रिंगणात उभे होते. या निवडणुकीत शेकापच्या जयंत पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाचं खापर शेकापचे जयंत पाटील यांनी ठाकरे गटावर फोडलं.

शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी आज अलिबाग झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलते होते. यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी विधानपरिषदेतील पराभवाचे विस्तृत विश्लेषण केले. यावेळी त्यांनी मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाल्याचा उच्चार पुन्हा करतानाच पराभवाचे खापर ठाकरे गटावर फोडले.

महाविकास आघाडीकडून दोनच उमेदवार देण्याचा निर्णय झाला होता. मात्र ठाकरे गटाने आयत्यावेळेस तिसरा उमेदवार दिला. यामुळे शरद पवार देखील नाराज झाल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे एकूणच महाविकास आघाडीमधील बिघाडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे

अन् जयंत पाटील यांचा कंठ आला दाटून

पराभवानंतर जयंत पाटील यांनी अलिबाग येथील शेतकरी भवनात शेकाप कार्यकर्त्यांची भेट घेतली. निवडणुक कशी झाली हे सांगताना या निवडणुकीदरम्यान घोडेबाजार झाल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला. एका मताची किंमत 25 कोटी रुपये असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला. यावेळी पक्ष पुन्हा नव्याने उभे करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. यावेळी जयंत पाटील यांच्या भावना अनावर झाल्या, कंठ दाटून आला. मात्र पाटील यांनी आपल्या अश्रूंना आवर घातला.

दरम्यान,राज्यातील विधानपरिषदेच्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीने ९ उमेदवार उभे केले होते. तर महाविकास आघाडीचे ३ उमेदवार उभे होते. या निवडणुकीत भाजपच्या पाचही उमेदवार जिंकले. तर शिंदे गट आणि अजित पवार गटाचे प्रत्येकी २ उमेदवार जिंकले. तर या निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव जिंकल्या. तर ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर जिंकले. मात्र, शेकापच्या जंयत पाटील यांना पराभवाचा सामना सहन करावा लागला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मुंबईत भटक्या कुत्र्यांचा हैदोस, लहान मुलांसह १० जणांवर हल्ला; थरकाप उडवणारा VIDEO

Maharashtra Live News Update: नाशिक शहरातील मध्यवर्ती भागात पुन्हा बिबट्याचा मुक्त संचार

Hema Malini: 'एक स्वप्न अपूर्ण राहिली...'; धर्मेंद्र यांच्या प्रेयर मीटमध्ये हेमा मालिनी भावुक झाल्या

Shocking : नाशिक हादरलं! बायकोच्या चारित्र्यावर संशय, नवऱ्याने बुटाच्या लेसने गळा आवळला

Accident: पहाटे अपघाताचा थरार! प्रवाशांनी खचाखच भरलेली बस दरीत कोसळली, १० जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT