A simple registered wedding in Solapur sends a powerful message of social responsibility. Saam Tv
महाराष्ट्र

अवघ्या 150 रुपयांत माजी आमदारांच्या कन्येचा विवाह; शाही खर्च टाळून शिक्षकांना 30 लाखांची मदत

Former Teacher Mlc Daughter Simple Wedding Story: सोलापुरात माजी शिक्षक आमदारांच्या कन्येने अवघ्या १५० रुपयांत नोंदणीकृत विवाह करत शाही खर्च टाळला.

Omkar Sonawane

  • • अवघ्या १५० रुपयांत साध्या पद्धतीने नोंदणीकृत विवाह
    • शाही विवाहाचा खर्च टाळून सामाजिक जाणीव जपली
    • २५–३० लाखांची मदत शिक्षकांच्या कुटुंबीयांसाठी
    • समाजाला सकारात्मक संदेश देणारा आदर्श विवाह

विश्वभूषण लिमये, साम टीव्ही

सध्या देशभरात शाही विवाहांचा प्रघात वाढताना दिसतोय. कोट्यवधी रुपयांचा खर्च, भव्य मंडप, महागडे दागिने यावर लाखोंचा चुराडा केला जातो. मात्र या साऱ्या बडेजावाला छेद देणारा एक आदर्शवत विवाह सोलापुरात पार पडला आहे. खर तर लग्न म्हणजे दोन परिवाराचे मिलन. पण मागच्या काही दिवसात लग्न म्हणजे लाखोंचा हुंडा, सोने, आलीशान गाडी आणि जोरदार आतषबाजी करत ग्रँड वेडीग करून पैशांची अमाप उधळपट्टी करून आयुष्यभर डोक्यावर कर्जाचा डोंगर घेऊन फिरणे.

पण या सगळ्याला काही लोक अपवाद ही ठरता आणि साध्या पद्धतीने विवाह करत शेवटपर्यंत सुखाने संसार करतात. माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांची कन्या सुषमा सावंत हिचा विवाह अवघ्या 150 रुपयांत नोंदणीकृत पद्धतीने पार पडला. सुषमाचा विवाह शुभम शिंदे या तरुणासोबत सोलापूरच्या जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयात साध्या पद्धतीने पार पडला.

शुभम शिंदे हे पाणीपुरवठा विभागात शासकीय अभियंता म्हणून कार्यरत आहेत. तर सुषमा सावंत हिने नुकतेच भारती विद्यापीठ, पुणे येथून एमएससी इन ह्यूमन ॲनाटॉमीचे शिक्षण पूर्ण केले आहे. दोन्ही वधू-वर उच्चशिक्षित असून समाजासाठी आदर्श ठरेल असा निर्णय त्यांनी घेतला आहे.

या साध्या विवाह सोहळ्याला दोन्ही कुटुंबातील मोजके नातेवाईक आणि मित्रपरिवार उपस्थित होते. विशेष म्हणजे, पारंपरिक विवाहावर होणारा खर्च टाळून २५ ते ३० लाख रुपये विनाअनुदानित शिक्षकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून देण्याचा निर्णय या नवविवाहित दाम्पत्याने घेतला आहे. ‘सावंत-शिंदे’ परिवाराच्या या सामाजिक जाणीवेने घेतलेल्या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, हा विवाह समाजासाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बुकिंग रद्द केल्याचा राग? वडाळा परिसरात Urban Company थेरपिस्टकडून हाणामारीचा दावा

लाडक्या बहिणींना दिलासा; ई-केवायसीसाठी पुन्हा मुदतवाढ मिळणार|VIDEO

Men Health: चाळीशीनंतर पुरुषांनी ‘हे’ चार Medical चेकअप आवर्जून करा; दुसरी चाचणी सर्वात महत्त्वाची

भाजपची तामिळनाडूवर नजर; स्टॅलिन सरकारविरोधात PM मोदींनी दंड थोपटले, काय आहे फॉर्म्युला?

Akola Politics : अकोला महापालिकेत हायव्होल्टेज राजकारण; भाजपला सत्तेपासून दूर ठेवणार, ४ पक्ष एकत्र

SCROLL FOR NEXT