- जितेश कोळी
Kokan Political News : राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम (Sanjay Kadam) हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटात प्रवेश करण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shidne) गटाला शह देण्यासाठी उद्धव ठाकरे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरु असल्याचे समजते. जानेवारी महिना अखेरीस माजी आमदार संजय कदम हे पुन्हा स्वगृही परतणार अशी चर्चा रत्नागिरी (ratnagiri) जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Maharashtra News)
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा राजकीय भूकंप घडण्याची चिन्हे सध्या पाहायला मिळत आहेत. शिवसेनेतून (shivsena) राष्ट्रवादीत (NCP) गेलेले माजी आमदार संजय कदम हे लवकरच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करून घरवापसी करणार असल्याचे वृत्त आहे.
याबाबत संजय कदम यांनी अद्याप अधिकृत घोषणा केली नसली तरी संजय कदम यांनी आपल्या कार्यकर्त्यांना एकत्रित आणण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. शिंदे गटाला शह देण्यासाठी उद्धव ठाकरे गटाने जोरदार तयारी केली असून शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) व माजी मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम हे पुन्हा एकदा स्वगृही परतणार आहेत.
जानेवारी महिन्याच्या अखेरीस युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांच्या प्रमुख उपस्थितीत खेड येथे जाहीर मेळावा घेऊन हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडणार असल्याचे वृत्त सूत्रांकडून प्राप्त झाले आहे. संजय कदम (सन 2015) विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीतून निवडून आले होते. त्यानंतरच्या (सन 2019) निवडणुकीत शिवसेनेचे आमदार योगेश कदम (yogesh kadam) यांनी संजय कदम यांचा पराभव करून राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेला हा मतदार संघ शिवसेनेकडे पुन्हा खेचून आणला होता.
मध्यंतरी माजी मंत्री रामदास कदम (ramdas kadam) यांनी अनिल परब यांच्यावर टीका करताना राष्ट्रवादीच्या पडलेल्या आमदाराला अनिल परब यांनी निधी उपलब्ध करून देत योगेश कदम यांना संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. आता संजय कदम यांचा शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी माजी मंत्री अनिल परब यांनीच पुढाकार घेतल्याचे विश्वसनीय सुत्रांकडून कळले असून रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य होते अशी चर्चा दापोली (dapoli) विधानसभा मतदार संघात सुरू आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.