Sakshi Malik, bajrang punia, jantar mantar
Sakshi Malik, bajrang punia, jantar mantarsaam tv

Wrestler Protest : बजरंग पुनिया, साक्षी मलिकसह कुस्तीगीरांनी गाठलं जंतर-मंतर; महासंघाविरोधात ठिय्या आंदाेलन

आंदाेलकांनी फेडरेशनच्या कार्यालयात यावे त्यांचे प्रश्न सोडवले जातील असे ताेमर यांनी स्पष्ट केले.
Published on

Wrestling Federation of India : कठाेर परिश्रम घेत देशाची शान उंचावणा-या खेळाडूंना कमी लेखण्याचे काम भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शर्मा करीत आहेत असा गंभीर आरोप करीत कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगट यांच्यासह अनेक कुस्तीपटूंनी आज दिल्लीत धरणे आंदाेलन (aandolan) केले आहे. दरम्यान महासंघाचे सहाय्यक सचिव यांनी कुस्तीपटूंनी संघटनेचे कार्यालयात यावे त्यांच्या समस्या दूर केल्या जातील असे म्हटले आहे.

Sakshi Malik, bajrang punia, jantar mantar
Sikander Shaikh News: सिकंदरवर अन्याय झाला सांगताना रशिद खानांचा अश्रूंचा फुटला बांध; ज्याने चूक केली त्याने...,

दिल्लीच्या जंतरमंतरवर कुस्तीपटू आंदोलनास बसले आहेत. कुस्तीपटूंनी त्यांच्या तक्रारी किंवा त्यांच्या मागण्यांचा नेमका तपशील शेअर केलेला नाही, परंतु ब्रिजभूषण शरण सिंह भारतीय कुस्ती महासंघचा (WFI) कारभार याेग्य पद्धतीने करीत नसल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे खेळाडूंना माेठा त्रास सहन करावा लागत आहे.

भारतीय कुस्ती महासंघाचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांनी आंदोलकांची भेट घेतली. ते म्हणाले, "याबाबत मला नेमकं माहित नाही. (WFI) अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रावरून काही कुस्तीपटू आंदोलनास बसले आहेत हे मला समजले. मी त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आलो आहे. सर्वांनी (आंदाेलकांनी) फेडरेशनमध्ये यावे त्यांचे प्रश्न सोडवले जातील असे ताेमर यांनी माध्यमांशी बाेलताना नमूद केले.

Sakshi Malik, bajrang punia, jantar mantar
Police Arrests Youth : विद्यार्थ्यास गावठी कट्टा, काडतुसांसह अटक; सातारा पाेलिसांनी दिली धक्कादायक माहिती

बजरंग, विनेश, रिओ ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिक, जागतिक चॅम्पियनशिप पदक विजेती सरिता मोर, संगीता फोगट, सत्यवर्त मलिक, जितेंद्र किन्हा आणि राष्ट्रकुल क्रीडा पदक विजेता सुमित मलिक यांच्यासह जंतरमंतर येथे सुमारे ३० कुस्तीपटू (wrestler) आंदाेलनास बसले आहेत.

बजरंग पुनिया म्हणाला, "आमची लढाई सरकार किंवा भारतीय क्रीडा प्राधिकरणाविरुद्ध नाही. ती भारतीय कुस्ती महासंघाविरुद्ध आहे. आम्ही नंतर तपशील शेअर करू. 'ये अब आर पार की लढाई है'."

बजरंगचा सपोर्ट स्टाफ, त्याचे प्रशिक्षक सुजित मान आणि फिजिओ आनंद दुबे यांचाही या आंदोलनात सहभाग आहे. हुकूमशाही खपवून घेतली जाणार नाही, असे आणखी एका कुस्तीपटूने नमूद केले.

ब्रिजभूषण शरण सिंह हे (2011 पासून) भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत. फेब्रुवारी (2019 मध्ये) त्यांची सलग तिसऱ्यांदा (WFI) महासंघाच्या अध्यक्षपदू निवड झाली.

दरम्यान साक्षी मलिक हिने खेळाडू देशासाठी पदके जिंकण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करतात पण महासंघाने आम्हाला नाराज करण्याशिवाय काहीही केले नाही. खेळाडूंना त्रास देण्यासाठी मनमानी नियम केले जात आहेत असे ट्विट केले आहे. (Tajya Batmya)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com