BJP News Saam TV
महाराष्ट्र

Padmakar Valvi BJP Resign : विधानसभेपूर्वीच भाजपला मोठा धक्का; माजी मंत्र्यांचा रामराम, VIDEO

Padmakar Valvi latest news : विधानसभेपूर्वीच भाजपला मोठा धक्का बसलाय. माजी मंत्री पद्माकर वळवी यांना भाजपला रामराम ठोकला आहे.

Saam Tv

नंदूरबार : विधानसभेआधी भाजपला मोठा धक्का बसला आहे. नंदूरबारमध्ये माजी मंत्री आणि भाजप नेते पद्माकर वळवी यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. धनगर आरक्षण संदर्भातील भूमिका न पटल्याने वळवी यांना भाजपचा राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वी वळवी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका केली होती.

माजी मंत्री आणि भाजपचे नेते पद्माकर वडवी यांनी अखेर भाजप सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. धनगर आरक्षण संदर्भात भूमिकांना पटल्याने भाजपला रामराम ठोकला आहे. आदिवासी समाजासाठी माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी भाजप पक्ष सोडला आहे.

राज्यातील आदिवासींचा आक्रमक चेहरा म्हणून माजी मंत्री पद्माकर वळवी ओळखले जातात. लोकसभेपूर्वी त्यांनी काँग्रेस सोडून भाजपत प्रवेश केला. मात्र विधानसभेपूर्वी त्यांनी निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत. मात्र ते काँग्रेसमध्ये जातात की, कुठल्या पक्षात हे मात्र अद्याप निश्चित झालेले नाही. त्यांनी भाजपचा सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबतचं पत्र भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवले आहे.

माजी मंत्री पद्माकर वळवी म्हणाले की, 'मी भाजपची साथ सोडत आहे. राज्यात आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न सुरु आहे. त्यावरून मी माझी सामाजिक आणि आर्थिक भूमिका आदिवासींच्या वतीने मांडली होती. हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. सरकारने याबाबत अद्याप कोणतही भूमिका घेतलेली नाही. मी आदिवासी नेता असून त्यांच्या प्रश्नांवर काम केलं आहे'.

'मी अनेकदा आदिवासींच्या प्रश्नांसाठी सरकारशी चर्चा करत आलो आहे. धनगर समाज प्रस्थापित आहे. तो समाज आदिवासींच्या आरक्षणात शिरु इच्छित आहे. सरकारने त्यांना आश्वासन दिलं आहे. त्याचा निषेध म्हणून मी माझ्या पक्षाच्या पदाचा राजीनामा देत आहे', असे वळवी यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अमेरिकेत पुराचा हाहाकार! 50 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: पंढरपुरात जूनी इमारत कोसळली

Mahadev Temple: शिवमंदिरात महिलांनी केव्हा जावे? जाणून घ्या योग्य वेळ

Valheri Waterfall: मुसळधार पावसामुळे वाल्हेरी धबधब्याचे सौंदर्य खुलले; पर्यटकांची प्रचंड गर्दी| VIDEO

Muharram : मोहरमच्या आनंदावर विरजण, आगीत हनुमंतचा मृत्यू; काळजात धस्स करणारी घटना

SCROLL FOR NEXT