Gangadhar Gade Death  Saamtv
महाराष्ट्र

Gangadhar Gade Death : चळवळीचा लढाऊ पँथर हरपला! माजी मंत्री गंगाधर गाडे यांचं निधन

Gangadhar Gade Death news : मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीमधील अग्रणी नेते आणि आंबेडकरवादी राजकीय-सामाजिक विचारांचे नेते, माजी मंत्री गंगाधर गाडे यांचं शनिवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झालं.

Vishal Gangurde

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीमधील अग्रणी नेते आणि आंबेडकरवादी राजकीय-सामाजिक विचारांचे नेते, माजी मंत्री गंगाधर गाडे यांचं शनिवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झालं. गाडे यांच्या पश्चात पत्नी सूर्यकांता गाडे, मुलगा डॉ. सिद्धांत गाडे, सून डॉ. भावना वंजारी गाडे, बहिण निर्मला गवई, मेहुणे गुणवंत गवई, नातवंडे असा परिवार आहे.

गंगाधर गाडे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माजी नेते होते. तसेच ते पँथर रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष होते. त्याचबरोबर ते राज्याचे माजी परिवहन राज्यमंत्री होते. गंगाधर गाडे यांच्या निधनाने आंबेडकरी विचारांच्या अनुयायांवर शोककळा पसरली आहे.

गाडे यांचा राजकीय प्रवास कसा होता?

गंगाधर गाडे राज्य सरकारमध्ये माजी परिवहन राज्यमंत्री होते. त्याचबरोबर पँथर चळवळीत लोकप्रिय बौद्ध नेते होते. त्यांनी ७ जुलै १९७७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावे, अशी सर्वात आधी मागणी केली होती. पुढे १९९४ मध्ये मराठवाडा विद्यापीठाचे नाव बदलण्यात आलं. या विद्यापीठाचा नामविस्तार हा 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ' असा करण्यात आला. गाडे यांनी अखेरपर्यंत आंबेडकरी विचारांची कास सोडली नव्हती.

दरम्यान, माजी राज्यमंत्री गंगाधर सुखदेव गाडे यांचं पार्थिव रविवार 5 मे रोजी दुपारी 12 ते 4 या वेळेत उस्मानपुरा पीर बाजार येथील त्यांच्या नागसेन विद्यालयाच्या प्रांगणात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर चार वाजता शिक्षण संस्थेच्या परिसरात अंत्यविधी करण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ...

Shocking: पंढरपुरात वारीला जाऊन आला अन् घरात येऊन आयुष्य संपवलं; खिशात सापडली 'ही' गोष्ट

Tandoor Roti Recipe: ढाबा स्टाइल परफेक्ट तंदूर रोटी, घरीच १० मिनिटांत बनवा

kalyan : मराठी-हिंदी वाद सुरू असतानाच शिवसेनेत शेकडो उत्तर भारतीयांचा प्रवेश

Haunted Island: जगातील सर्वात भयानक झपाटलेले बेट, आवाज, आत्म्यांचा त्रास! वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT