Former Majalgaon Chief Accused of Cheating Sister in Land Fraud Case Saam Tv News
महाराष्ट्र

Beed: माजी नगरध्यक्षाने पत्नीसाठी सख्ख्या बहिणीला फसवलं; खोट्या सह्या करून प्लॅट ताब्यात घेतला

Shocking Fraud: माजलगावात माजी नगराध्यक्ष अशोक होके यांनी सख्ख्या बहिणीची फसवणूक केली. प्लॉट पत्नीच्या नावावर केल्याप्रकरणी त्यांच्यासह पाच जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल.

Bhagyashree Kamble

बीडच्या माजलगावातून विश्वासाला तडा देणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माजी नगराध्यक्ष यांनी सख्ख्या बहिणीची फसवणूक केली आहे. त्यांनी बहिणीचा प्लॉट पत्नीच्या नावे केला आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर बहिणीनं थेट पोलिसांत धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी एकूण ५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अशोक हाके असे माजी नगराध्यक्षांचे नाव आहे. त्यांनी आपल्या सख्ख्या बहिणीची फसवणूक केली आहे. अशोक यांनी बहिणीच्या नावे असलेला प्लॉट नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांशी संगनमत करून थेट आपल्या पत्नीच्या नावावर करून घेतला. विशेष म्हणजे, अवघ्या १०० रुपयांच्या बॉण्ड पेपरवर बनावट सह्या करून खोटं हक्क सोडपत्र तयार करण्यात आलं.

या प्रकरणाची माहिती संबंधित बहिणीला मिळताच त्यांनी थेट माजलगाव शहर पोलीस ठाणे गाठले. तसेच तक्रार दाखल केली. महिलेनं दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी अशोक होके, त्यांची पत्नी उज्ज्वला होके आणि नगरपालिकेचे तीन तत्कालीन कर्मचारी, अशा ५ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

सध्या माजलगाव शहर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kanda Poha Recipe: मऊ आणि मोकळे कांदा पोहे बनवण्यासाठी 'या' 5 सोप्या टिप्स नक्की लक्षात ठेवा

HSC Hall Ticket: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, हॉल तिकिटाबाबत मोठी अपडेट समोर

धक्कादायक! भाजप नेता स्टेजवर चढताना धाडकन तोंडावर आपटला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News Update : नाशिक महापालिका निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात नेत्यांच्या सभांना वेग

Somatic Yoga Benefits: पाठदुखी आणि सांधेदुखीवर रामबाण उपाय; घरच्या घरी करा सोमॅटिक योगा, ही आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT