Mahadevrao Shivankar Passes Away : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक दुःखद बातमी समोर आली. भाजपाचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी अर्थमंत्री महादेवराव शिवणकर यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. जनसंघापासून ते भाजपचे ज्येष्ठ नेते असा त्यांचा राजकीय प्रवास राहिलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलेय. पूर्व विदर्भात भाजपाच्या उभारणीत त्यांनी दिलेले योगदान अतिशय मोलाचे असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. एक्सवर पोस्ट करत देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
माजी अर्थमंत्री महादेवराव शिवणकर यांनी जलसंपदा मंत्री आणि अर्थमंत्री म्हणून काम पाहिलेय. मनोहर जोशी (CM Manohar Joshi) मुख्यमंत्री असताना शिवणकर यांनी कारभार सांभाळला होता. जनसंघापासून शिवणकर यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली होती. जनसंघ ते भाजपचे ज्येष्ठ नेते असा त्यांचा राजकीय प्रवास राहिलाय. शिवणकर यांच्या निधनाने कुटुंबियांसह राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. महादेवराव शिवणकर यांच्या मागे मुलगा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय शिवणकर व संजय शिवणकर यांच्यासह बराच मोठा आप्त परिवार आहे.
भारतीय जनसंघ ते भारतीय जनता पार्टी अशा प्रदीर्घ प्रवासाचे महादेवराव शिवणकर साक्षीदार होते. महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री, चिमूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार म्हणूनही काम पाहिलेय. गोंदिया जिल्ह्याच्या निर्मितीसोबतच जिल्ह्यामध्ये विविध सिंचन प्रकल्पांच्या निर्मितीत त्यांचे मोलाचे योगदान होते. शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या आणि जनसामान्यांच्या सेवेसाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले. तसेच पूर्व विदर्भ परिसरात राष्ट्रीय विचारधारेची पाळेमुळे खोलवर रुजण्यामध्ये त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती.
भाजपाचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी अर्थमंत्री महादेवराव शिवणकर यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी आहे. पूर्व विदर्भात भाजपाच्या उभारणीत त्यांनी दिलेले योगदान अतिशय मोलाचे होते. विधानसभा, लोकसभेत त्यांनी सामान्यांचे प्रश्न मांडण्याचे काम सातत्याने केले. शेती आणि सिंचन हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय होते. त्या क्षेत्रात त्यांनी केलेले काम कायम स्मरणात राहील. एक कर्मठ नेता म्हणून त्यांची ओळख होती. नक्षलग्रस्त भागाचा कायापालट व्हावा आणि तेथे विकास व्हावा, ही त्यांची तळमळ असायची. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.