Nagpur Crime saam tv
महाराष्ट्र

Nagpur News: नागपूरच्या माजी उपमहापौरांना अटक, पुनम बँक घोटाळा प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई

Poona Urban Bank Nagpur Crime: रेशीमबाग येथील पुनम अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीत ३ कोटी ४१ लाख रुपयांचा घोटाळा उघड झाला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी सकाळी माजी उपमहापौर रवींद्र ऊर्फ छोटू भोयर यांना अटक केली.

Dhanshri Shintre

नागपूरचे माजी उपमहापौर आणि काँग्रेस नेते रवींद्र उर्फ छोटू भोयर यांना आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी सकाळी ८ वाजता अटक केली. रेशीमबाग येथील पुनम अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीत ३.५ कोटी रुपयांच्या गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. २०१९ मध्ये गुंतवणूकदार हर्षवर्धन झंझाड यांनी सक्करदरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. संचालक मंडळावर अधिकारी व एजंटच्या मदतीने नियमांचे उल्लंघन करून अनेकांना कर्ज देण्याचा आरोप आहे. भोयर यांना न्यायालयात हजर करण्यात आले असून, २५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेशीमबाग येथील पुनम अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीत घोटाळा झाल्याचे उघड झाले. २०१९ साली हर्षवर्धन श्रावण झंजाड यांनी सक्करदरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार, बँकेकडून ११७ खातेधारकांचे एकूण ३ कोटी ४१ लाख रुपये लंपास करण्यात आले होते. या प्रकरणी सखोल तपास सुरू असून आर्थिक गैरव्यवहारामागील जबाबदारांना अटक करून योग्य कारवाई केली जात आहे.

२ जुलै २०१९ रोजी पुनम अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीतील आर्थिक घोटाळ्याच्या तक्रारीची चौकशी करून पोलिसांनी फसवणूक आणि विविध कायद्यांखाली १० ते १५ संचालक व अध्यक्षांविरोधात गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान, दहा आरोपींवर गुन्हे नोंदवून काहींना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अरुण लक्ष्मणराव फलटणकर, चंद्रकांत अजबराव बिहारे, प्रियदर्शन नारायणराव मंडलेकर, राजू रामभाऊ घाटोळे आणि प्रसाद प्रभाकर अग्निहोत्री यांचा समावेश आहे. पोलिसांनी आर्थिक गैरव्यवहारातील संपूर्ण साखळी उघड करण्यासाठी तपास तीव्र केला असून इतर आरोपींच्या भूमिकेचीही चौकशी सुरू आहे.

रामदास समर्थ, संगीता अनिल शाहू, निशा जगनाडे आणि सुभाष शुक्ला यांना या प्रकरणात अटकपूर्व जामिन मंजूर झाला होता, तर आरोपी मधुकर गोपाळराव धवड यांचा मृत्यू झाला आहे. २०२३ मध्ये आर्थिक गुन्हे शाखेने बँकेच्या प्रकरणाचे ऑडिट लेखापरीक्षक सुनील दहिघाने यांच्याकडून केले. या ऑडिट रिपोर्टमध्ये संस्थेच्या संचालकांवर कारवाईचे सूतोवाच करण्यात आले होते. घोटाळ्यातील अन्य आरोपींच्या सहभागाची तपासणी करत, आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित सर्व बाबींचा खुलासा करण्यासाठी तपास अधिकाधिक गतिमान करण्यात आला आहे.

तत्कालीन संचालक छोटू भोयर यांच्यावर देखील पुनम अर्बन घोटाळ्याप्रकरणी आरोप होते, मात्र कारवाई दीर्घकाळ थंडावली होती. अखेर २४ जुलै २०२४ रोजी संस्थेचे अध्यक्ष रमन सेनाड यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी सकाळी भोयर यांच्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यासमोर हजर केले गेले आणि त्यांना २५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. यामुळे प्रकरणाची चौकशी पुन्हा गतिमान झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajgira Puri Recipe: नवरात्रीला उपवासासाठी बनवा खास राजगिऱ्याची पुरी, रेसिपी नोट करा

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्याला आज येलो अलर्ट

Mumbai Crime News: मालाडमध्ये बार डान्सरची हत्या; नको त्या अवस्थेत सापडला मृतदेह, नेमकं प्रकरण काय?

Navratri Festival : नवरात्रीची अनोखी परंपरा; कडक उपवासात ९ दिवस बसायचं नाही, झोपायच पण तेही उभं राहून

IND vs SL: श्रीलंकेविरूद्ध टीम इंडियामध्ये ३ बदलांची शक्यता; फायनलपूर्वी 'या' खेळाडूंना मिळणार संधी, पाहा कशी असेल प्लेईंग 11

SCROLL FOR NEXT