congress  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा धक्का;बडा नेता भाजपच्या वाटेवर, राजकीय समीकरण बदलणार

jalna political news : काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे माजी आमदार भाजपच्या वाटेवर आहे.

Vishal Gangurde

  • कैलास गोरंट्याल यांनी पराभवानंतर काँग्रेसमध्ये असमाधानी असल्याचे स्पष्ट केले आहे.

  • काँग्रेसने उमेदवारांना समर्थन न देता फक्त तिकीट दिले आणि समर्थनात कमी पडले आहे, असा गोरंट्याल यांचा आरोप आहे.

  • जालना काँग्रेसमध्ये गटबाजी असल्याचं बोललं जात आहे.

  • गोरंट्याल हे भाजपकडे वळल्यास जालन्यातील राजकीय समीकरण बदणार असल्याची चर्चा आहे.

अक्षय शिंदे, साम टीव्ही

जालना : जालन्यात काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गौरंट्याल भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. दोन दिवसांपूर्वी गोरंट्याल यांची भाजप नेत्यांसोबत चर्चा झाल्याची माहिती आहे. कैलास गोरंट्याल विधानसभा निवडणुकीपासून काँग्रेस पक्षात नाराज होते. त्यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसला मोठा धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी कैलास गोरंट्याल यांनी भाजप नेत्यांशी संवाद साधला. यानंतर कैलास गोरंट्याल हे भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली. विधानसभा निवडणुकीपासून काँग्रेसचे कैलास गोरंट्याल काँग्रेस पक्षात नाराज होते.

कैलास गोरंट्याल भाजप पक्षप्रवेशावर थेट बोलत नसले तरी भाजप पक्षप्रवेशाबाबत नकार देेखील देत नाहीत. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे.कैलास गोरंट्याल यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झाल्यास जालना जिल्ह्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे.

'आईना बनने का, हरजाना भरना है मुझे, कब का तूट चुका था मै, बस अब निखरना है मुझे. ये बता दे साले दिलेरे कब तक इम्तिहान देना है मुझे, अशा शब्दात माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजप पक्षप्रवेशाबाबत शेरोशायरीत उत्तर दिलं आहे. कैलास गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशाने जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलणार असल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Body Election : आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्या गोष्टींवर लागणार निर्बंध? जाणून घ्या

Horoscope 6 November: या राशींसाठी आजचा दिवस असेल खास, तुमची रास कोणती?

Maharashtra Live News Update: - विमानाचं लँडिंग करताना विमनाच्या पंखात अडकला पतंगाचा मांजा

Suraj Chavan Wife : बिग बॉस किंग सूरज चव्हाणची बायको कोण? नावही आहे खास

Maharashtra Politics: कोकणात मोठी राजकीय घडामोड, भाजपकडून ठाकरेसेना अन् शिंदेसेनेला धक्का; बड्या नेत्यांनी हाती घेतलं 'कमळ'

SCROLL FOR NEXT