Uddhav Thackeray latest News Saam tv
महाराष्ट्र

Uddhav Thackeray News : 'मुख्यमंत्र्यांना भाषण वाचता येतं, पण...'; उद्धव ठाकरेंचा CM एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल

Uddhav Thackeray latest Speech :' मुख्यमंत्र्यांना भाषण वाचता येतं, पण शेतकऱ्याचं रक्ताने लिहिलेले पत्र वाचता येत नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली

साम टिव्ही ब्युरो

Uddhav Thackeray latest Speech: शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रभर दौरे आणि सभा सुरू केल्या आहेत. काही दिवसांपूर्वीची खेडची सभा झाल्यानंतर उद्धव ठाकरे आज मालेगावमध्ये सभा घेत आहेत. उद्धव ठाकरेंनी या सभेत मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीकास्त्र सोडलं.

'मुख्यमंत्र्यांना भाषण वाचता येतं, पण शेतकऱ्याचं रक्ताने लिहिलेले पत्र वाचता येत नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. (Latest Marathi News)

मालेगावच्या सभेत शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, 'मुख्यमंत्री पद येतं आणि जातं, पण आपल्या कुटुंबातील एक माणूस म्हणून तुम्ही जे प्रेम मला दिलं, ते मला नाही वाटतं गद्दारांच्या नशीबी असेल. आज आपलं नाव, धनुष्यबाण चोरलं, माझ्या हातात काहीही नाही. तरी इतकी गर्दी, ही पुर्वजांची पुण्याई आणि जगदंबेची कृपा. मी तुमच्या प्रश्नांसाठी लढतोय'.

'माझ्या शेतकर्‍यांना कर्जमुक्त करणे हे सत्तेवर आल्यावर पहिले पाऊल होतं. शेतकर्‍याला मार्गदर्शन मिळायला हवं, पिकलं की विकलं गेलच पाहिजे. शेतकर्‍याला केवळ हमी भाव नाही, तर हमखास भाव मिळायलाच पाहिजे हा माझा आग्रह होता. मला उत्तर द्यायला उत्तरसभा घेणार आहात ना? रतनकाका सारख्या शेतकर्‍याला जे तुमच्या नाकर्तेपणामुळे पिचले गेले आहेत. त्यांना आधी उत्तर द्या, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना केलं.

'स्वत:च्या रक्ताने शेतकर्‍याने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय. पण रक्ताने पत्र लिहूनही मुख्यमंत्र्याला वाचता येत नाही. भाषण बरं वाचता, पण माझ्या शेतकर्‍याच पत्र वाचू शकत नाही? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका केली.

'शेतकर्‍याने भावना व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्री महोदय तुम्ही शेतकर्‍याचे पुत्र आहात. केंद्रात भाजपचे सरकार आहे, त्यांचे धोरण शेतकरी विरुद्ध आहे. त्याविरुद्ध तुम्ही आवाज उठवा. कोण आवाज उठवणार? बकरी कधी आवाज उठवते? तोंड उघडल की काय तोंडातून बाहेर पडणार? कोणाकडून अपेक्षा करता? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kondura Beach : येणारा मोठा वीकेंड सिंधुदुर्गला प्लान करा; 'कोंडुरा' बीचचं सौंदर्य पाहून मालदीव,थायलंड विसराल

Maharashtra Live News Update: अकोल्यात बकरीला वाचवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा पाण्यात बुडुन मृत्यू

Kishor Kadam : किशोर कदम यांचे राहते घर धोक्यात; सरकारला केली विनंती, नेमकं प्रकरण काय?

दुहेरी हत्याकांडाने ठाणे हादरलं, भाजप नेत्याची कार्यलयातच हत्या, भिवंडीत रात्री ११ वाजता काय घडलं?

खोटं धर्मांतरण करून दुसरं लग्न, पोलीस कर्मचाऱ्याला सेवेतून बडतर्फ; धुळ्यात खळबळ

SCROLL FOR NEXT