prithviraj chavan saam tv
महाराष्ट्र

Pruthviraj Chavan Threat News: माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना धमकी, संभाजी भिडेंवर कारवाईची केली होती मागणी

Pruthviraj Chavhan News: सध्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड येथील निवासस्थानी पोलिसांचा (Karad City Police) बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Priya More

Satara News: माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण (Congress Leader Pruthviraj Chavan) यांना धमकीचा फोन आला आहे. संभाजी भिडे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्या प्रकरणी आणि कारवाई करण्यातची मागणी केल्याप्रकरणी त्यांना धमकीचा (Pruthviraj Chavan Threat Call) फोन आला असल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सध्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड येथील निवासस्थानी पोलिसांचा (Karad City Police) बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेमध्ये संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत प्रश्न उपस्थित केले होते. या मागणीनंतर पृथ्वीराज चव्हाण यांना धमकीचा फोन आणि ईमेल आला आहे. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यामध्ये फोन करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्याचसोबत पृथ्वीराज चव्हाणांच्या कराड येथील निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

नांदेडमधून हा फोन आणि ईमेल करण्यात आला असून अक्षय चौराडे नावाच्या तरुणाने हा कॉल केला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. कराड शहर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या तरुणाला अटक करण्यासाठी पोलिसांची पथके नांदेडच्या दिशेने रवाना होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या धमकीच्या फोनमुळे पृथ्वीराज चव्हाण यांचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.

पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेमध्ये संभाजी भिडेंविरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यांनी असे सांगितले होते की, 'अमरावतीमध्ये संभाजी भिडे नावाच्या व्यक्तीने राष्ट्रपित्यांच्याबद्दल निंदा करणारे वक्तव्य केले आहे. अशाप्रकारे समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीला ताबडतोब अटक केली पाहिजे. समाजामध्ये दंगे आणि तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न या व्यक्तीकडून गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. यामुळे काही पडसाद उमटले तर याला कोण जबाबदार असणार आहे. या व्यक्तीविरोधात तात्काळ कारवाई करा,अशी मागणी त्यांनी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Body Election: मतदानाआधी पिंपळपारमध्ये पैसे वाटप,निलेश राणेंचा भाजपवर पैसे वाटपाचा आरोप

Maharashtra Nagar Parishad Live : जालना जिल्ह्यातील नगरपालिका मतदान टक्केवारी

Kalyan News: शहरात एकाच नंबरच्या दोन रिक्षा; दंड ठोठावल्यानंतर झाला कल्याणमधील बनावट नंबरप्लेटचा पर्दाफाश

Local Body Election: पैसे वाटप करणाऱ्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला पकडलं; संतप्त नागरिकांनी मतदान केंद्राबाहेरच चोपलं

Santosh Bangar : संतोष बांगर वादाच्या भोवऱ्यात; निवडणूक अधिकाऱ्यांकडून गुन्हा दाखल, आमदारांनी काय केलं?

SCROLL FOR NEXT