Sambhaji Bhide News Update: गुन्हा दाखल होताच संभाजी भिडेंच्या अटकपूर्व जामीनासाठी हालचालींना वेग, महात्मा गांधींबद्दल केलं होतं वादग्रस्त विधान

Case Register Against Sambhaji Bhide: वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी त्यांच्याविरोधात अमरावतीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sambhaji Bhide
Sambhaji BhideSaam Tv
Published On

अमर घटारे, अमरावती

Sambhaji Bhide Controversial Statement: महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे (Shiv Pratistan President Sambhaji Bhide) यांच्यावर सर्व स्तरावरुन टिकेची झोड सुरु आहे. संभाजी भिडेंविरोधात राज्यभरात आंदोलन सुरु आहेत. या वक्तव्याप्रकरणी त्यांच्याविरोधात अमरावतीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संभाजी भिडेंच्या अटकपूर्व जामीन्यासाठी हालचाली सुरु झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

Sambhaji Bhide
CM Eknath Shinde News: खड्ड्यांचा मुद्दा अधिवेशनात गाजताच मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडवर; ठाण्यातून पाहाणी दौऱ्याला सुरूवात

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीमध्ये संभाजी भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता त्यांना अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. शिव प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी अमरावती शहरातील प्रसिद्ध वकिलांची भेट घेतली आहे. वकिलांचा सल्ला घेऊन अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर येत आहे. संभाजी भिडे यांनी दोन दिवसांपूर्वी अमरावतीमध्ये महात्मा गांधी यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांच्याविरोधात राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sambhaji Bhide
Examination Of Teachers: मराठवाड्यातील गुरुजींना वाटते परीक्षेची भीती, ८ हजारांपैकी फक्त ९७७ शिक्षकांची हजेरी

शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते सध्या अमरावतीच्या सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर आणि काँग्रेसच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. काँग्रेसने अमरावतीमध्ये शनिवारी संभाजी भिडे यांच्याविरोधात आंदोलन करत घोषणाबाजी केली होती. यावेळी यशोमती ठाकूर यांनी संभाजी भिडे यांनी शहराताली वातावरण बिघडवणल्याचा आरोप केला होता. शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी यशोमती ठाकूर यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी असी मागणी केली आहे.

Sambhaji Bhide
Cyber Crime News : सायबर गुन्हेगारांच्या रडारवर अधिकारी; आतापर्यंत आठ अधिकाऱ्यांच्या नावे बनावट खाते, केली पैशांची मागणी

संभाजी भिडे यांनी अमरावती येथील सभेत महात्वा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. 'महात्मा गांधींचे वडील करमचंद गांधी नसून एक मुस्लीम जमीनदार होते.', असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे वातावरण तापले आहे. राज्यभरात त्यांच्यावर टीका होत असून आंदोलन केली जात आहे. तसंच त्यांच्या अटकेची मागणी केली जात आहे.

संभाजी भिडे यांनी असे सांगितले होते की, 'मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते. त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले. त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत. मोहनदास यांचा सांभाळ आणि शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले होते.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com