prithviraj chavan, satara saam tv
महाराष्ट्र

Prithviraj Chavan: भाजप काँग्रेसमध्ये फूट पाडणार का? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले....

Prithviraj Chavan Latest News: दुसरीकडे भाजप काँग्रेसमध्ये फूट पडेल का, यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. मात्र, चर्चेला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पूर्णविराम दिला आहे.

Vishal Gangurde

अमर घटारे, अमरावती

Prithviraj Chavan News:

सर्व राजकीय पक्षांना आगामी लोकसभा निवडणुकींचे वेध लागले आहेत. आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून जागा वाटपांची चर्चा सुरु झाली आहे. याचदरम्यान माजी खासदार मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केला. तर दुसरीकडे भाजप काँग्रेसमध्ये फूट पडेल का, यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. मात्र, चर्चेला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पूर्णविराम दिला आहे. (Latest Marathi News)

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. भाजप काँग्रेसमध्ये फूट पाडेल का, यावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 'भाजपचा आत्मविश्वास ढळलेला आहे. 2014 मध्ये त्यांनी जे आर्थिक धोरण मांडलं, ते फसलेलं आहे. 2019 चे राष्ट्रीय सुरक्षा धोरण फसलेलं आहे. आता राम मंदिराचा मुद्दा पुढे करत आहे. तरी त्यांना काही यश मिळणार नाही. त्यामुळे ते ED,CBI चा वापर करून नेते विकत घेत आहेत. याचा अर्थ त्यांना निवडणूक सोपी नाही हे त्यांना कळून चुकले आहे. त्यामुळे ते इतर नेत्यांना फोडण्याचा प्रयत्न करत आहे'.

जागावाटपावर केव्हा निर्णय घेण्यात येईल?

जागावाटपावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 'तीन पक्षांची चर्चा सुरू झाली, दोन्ही मित्र पक्षांमध्ये फाटाफूट झालेली आहे. त्यामुळे नेते किती आहेत, फुटलेल्या नेत्यांमागे जनता गेली, काय याचा आकलन करणे सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर आघाडीत जागा वाटपासंदर्भात निर्णय घेतला जाईल'.

प्रकाश आंबेडकरांवर चव्हाण काय म्हणाले?

'इंडिया आघाडी 28 पक्षांची आघाडी आहे. प्रकाश आंबेडकर हे इंडिया आघाडीच्या नेत्यांना वैयक्तिकरित्या ओळखतात. त्यांना मल्लिकार्जुन खरगे यांना भेटायचं असेल तर ते प्रत्यक्ष भेटून किंवा बोलून आघाडीत येऊ शकतात. त्यांना मोदींना हरवायचं की नाही हा खरा प्रश्न आहे, असे ते पुढे म्हणाले.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'आंबेडकर यांच्या प्रवक्त्यांनी एक पत्र पाठवलेला आहे, त्यांनी वैयक्तिक अजूनही पत्र पाठवलेलं नाही, त्यांना खरगेंना प्रत्यक्ष भेटायला काय अडचण आहे? आंबेडकर हे देशातील मोठे दलित नेते आहे. ते आंबेडकर नाव असलेले नेते आहेत, ते संसदेत आले पाहिजे, आमची ही प्रामाणिक इच्छा आहे, असेही चव्हाण म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नो पार्किंग क्षेत्रात कॅबिनेट मंत्र्याची कार; पोलिसांनी क्रेनने उचलून नेली, व्हिडिओ व्हायरल

HSRP नंबरप्लेटसंदर्भात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, वाहनधारकांना दिलासा; 'या' तारखेपूर्वी करा काम

Nandurbar : चांदसैली घाटात दरड कोसळली; थोडक्यात दुर्घटना टळली

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Heart blockage symptoms:हार्ट ब्लॉकेज झाल्यावर शरीरात दिसतात ६ मोठे बदल; तुम्हालाही त्रास होत असेल तर सावध व्हा

SCROLL FOR NEXT